मुंबईत कोरोना व्हायरसमुळे पुन्हा वाढती बाधितांची संख्या हे चिंतेचे कारण बनले आहे. गेल्या काही दिवसांत महानगरपालिका ‘एस’ प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. जे पाहता पालिका एस विभागाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपाययोजना म्हणून प्रभागातर्फे कडक निर्देश देण्यात आले आहेत. गर्दी करणे टाळणे, स्विमिंग पूल, जीम बंद ठेवणे अशा सोबतच पालिकेने ८ निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी केवळ १० बाधित असणाऱ्या या प्रभागात काहीच दिवसात बाधितांची संख्या पन्नाशीत आली आहे. महानगरपालिकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५ किंवा त्यापेक्षा अधिक बाधित मिळून आलेल्या कोणत्याही इमारतीला सीलबंद केले जाईल आणि प्रतिबंधित क्षेत्र म्हणून मानले जाईल. या भागात सद्यस्थितीत १८ इमारती सिल केल्या गेल्या आहेत. मुंबईत सध्याचा सरासरी वाढीचा दर ०.२८ टक्के आहे. जिथे मुंबईत दुपटीचा दर २४९ दिवसांपेक्षा जास्त असताना एस विभागात हाच दर २६५ एवढा आहे.
एस प्रभागात वाढणारा कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी पालिकेने आता सोसायट्यांना (गृहनिर्माण संस्था) आवाहन करत त्यांच्या जिम, स्विमिंग पूल, बागा, क्रीडांगणे यांचा वापर त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे. इमारतीच्या परिसरात फिरताना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. गर्दी करणे टाळणे, प्रवेशाच्या ठिकाणी सनिटायझर ठेवणे. मुंबईबाहेरून रहिवाशी आले असल्यास त्याची माहिती वॉर्डच्या वॉर रूमला देणे आवश्यक असणार आहे. या प्रभागातील प्रसार रोखण्यासाठी पालिका एस विभागाने अशाप्रकारचे ८ निर्देश दिले आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.