पवईतील निटी भागात प्रार्थनेसाठी आलेल्या एका वृद्ध दाम्पत्यास पुढे खून झाल्याची बतावणी करून दोन ठगांनी तीन तोळे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. पवई पोलिसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीमुंबई येथे राहणारे बलराज नाडर (७१) तसेच त्यांच्या पत्नी व्हिक्टोरिया (६४) सोबत आपल्या पवई […]













