Archive | Crime

3 arrested for throwing stones on Powai police vehicle

पवई पोलिसांच्या गाडीवर दगडफेक; ३ आरोपींना अटक

प्रमोद चव्हाण पवई परिसरात गस्त घालत असताना पोलीस गाडीवर हल्ला करणाऱया ३ तरुणांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहुल सिंग, इस्माईल शेख, शिवकुमार उर्फ भैय्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपी हे नशेखोर असून, पोलिसांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे. पोलीस शिपाई अजय बांदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी […]

Continue Reading 0
Now-cyber-cells-at-every-police-stations-of-Mumbai-1

शाब्बास पवई पोलीस; सायबर चोरट्याने उडवलेले २ लाख मिळवले परत

सध्याच्या काळात सायबर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, दररोज कोणी-ना-कोणी त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहे. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून तांत्रिक मदतीने गुन्हे करत असल्याने त्यांना पकडणे म्हणजे एक दिव्यच असते. मात्र भल्या भल्या गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत वठणीवर आणणाऱ्या मुंबई पोलिसांनी या सायबर चोरट्यांना सुद्धा वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. पवई पोलिसांनी अशाच प्रकारे सायबर […]

Continue Reading 0
Powai police handcuff expensive bicycle thief

महागड्या सायकल चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई आणि आसपासच्या परिसरातून महागड्या सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवई पोलिसांनी त्याच्याकडून ११ मे रोजी चोरी केलेली एक महागडी सायकल सुद्धा हस्तगत केली आहे. अश्विन ईश्वरलाल मोहिते (१९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनाकीया रेंनफॉरेस्ट सोसायटी, येथे राहणारे ४३ वर्षीय फिर्यादी […]

Continue Reading 0
लुटेरे

पोलीस असल्याची बतावणी करत महिलेचे २.१२ लाखाचे दागिने लांबवले

पोलीस असल्याची बतावणी करत पवईतील एका महिलेची फसवणूक करून तिच्याजवळील २.१२ लाखाचे दागिने भामट्यांनी लांबवले आहेत. बुधवारी पवई परिसरात ही घटना घडली असून, पवई पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आपल्या कामासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी रस्त्यावर अडवले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे त्या महिलेला सांगत […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

बीएमसी अधिकारी असल्याचे सांगून मास्क का लावला नाही म्हणत लूट

बीएमसी अधिकारी असून, मास्क का लावला नाही? असे सांगत एका छोट्या व्यावसायिकाला लुटल्याची घटना पवईत घडली आहे. कोरोना काळात असणाऱ्या या सक्तीचा फायदा घेवून, लुटारूनी नवीन शक्कल लढवली आहे. या संदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईसह अडकलेला महाराष्ट्र आता हळूहळू निसटू लागला आहे. मात्र […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

आंतरराष्ट्रीय कॉलिंग अॅपचा वापर करून तरुणीला धमकी देण्याऱ्या रोमिओला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रेमात असताना एका १७ वर्षीय महाविद्यालयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग अॅपचा वापर करून तरुणीला धमकी दिल्याबद्दल एका १९ वर्षीय रोमिओला साकीनाका पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. अटक आरोपीने महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडले आहे. १९ वर्षीय आरोपी दोघांच्यामधील संबंध संपवल्यानंतरही आणि तिचा मोबाईल नंबर बदलल्यानंतरही तिचा पाठलाग करत असल्याची तक्रार पीडित मुलीने ५ […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

रिक्षा चोरीच्या संशयातून पेटवले घर

रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून रिक्षा मालकांनी ४३ वर्षीय व्यक्तीचे घर जाळल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. याबाबत पवई पोलिस गुन्हा नोंद करून आरोपींना ताब्यात घेवून अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो. पवईसह, साकीनाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. वर्षभरापूर्वी जामीनावर […]

Continue Reading 0
arrested

जामिनावर सुटलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह तिघांना हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक

पवई परिसरातील शिवशक्ती नगर येथील एका साडीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून, दुकान मालकाला चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. २१ एप्रिलला ४ अज्ञात इसम हे […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत १७ वर्षीय तरुणाचा खून; मारहाणीचा व्हिडीओ केला शूट; आरोपींना ५ तासात अटक

पवईतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, ३१ मार्चला पहाटे उघडकीस आली होती. अनिकेत रामा बनसोडे असे या तरुणाचे नाव असून, त्याला मारहाण करत त्याचा खून केल्याचे समोर येताच पवई पोलिसांनी पाच तासात ४ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपी जेविएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

मोटारसायकल चोराच्या ८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या; पवई पोलिसांची कारवाई

पवई पोलिसांच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याच्या ८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. सरफराज शेख (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली असून, अजूनही काही गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. व्यवसायाने फोटोग्राफर असणारे हर्षद दिलीप जिमकाडे […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

१.६ किलो गांजासह पवईत एकाला अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]

Continue Reading 0
accident

रामबाग उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडकून अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू

पवई, रामबाग उड्डाणपुलाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री पवईत घडली. २० वर्षीय तरुण विक्रोळीच्या दिशेने जात असताना  डिव्हायडरला (दुभाजक) धडकून हा अपघात झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे. स्वप्नील सुभाष अहिवले (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रपाळी कर्तव्यावर असणाऱ्या पवई […]

Continue Reading 0
Powai-house-breaking-theft-accused-arrested

सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुरुवारी पार्कसाईट येथून बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय उर्फ लंब्या अरुण बाईत (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पवई येथील एक घरफोडी आणि चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. २ मार्च रोजी पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये घुसून मौल्यवान वस्तू आणि रोकड […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नागेश शंकर गायकवाड (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. पवई परिसरात जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलअर) मार्गावरून बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, मौल्यवान […]

Continue Reading 2
mach enginer arrested 14012017

पवईत गांजासह एकाला अटक

पवई परिसरातील मिलिंदनगर भागात गस्त घालत असताना पवई पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला १ किलो गांजासह अटक केली आहे. कैलाश शेषराव साबळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवई पोलीस त्याला गांजा विकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणासाठी  पोलिसांकडून पायी गस्त घातली […]

Continue Reading 0
murder recovery

पवई खून प्रकरण: दोन आरोपींना हत्यारासह पवईतून अटक; गुन्हे शाखेची कारवाई

पवई येथील ४० वर्षीय राजेश भारद्वाज याचा खून करून पसार झालेल्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल फोन, सीम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले आहे. नूर युनुस खान (वय २२ वर्ष) आणि सलीम आरिफ खान (वय २१ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. […]

Continue Reading 0
Sakinaka police arrested duo for stealing electronic goods worth Rs 18 lakh

साकीनाका येथे गोडाऊन फोडून १८ लाखाची चोरी करणाऱ्या चोरट्यांना ३ तासात अटक

साकीनाका येथील अरिहंत इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या एमएमपीएम या कंपनीची भिंत तोडून लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरुन नेणाऱ्या ३ आरोपींना साकीनाका पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. इमरान मेहरान शेख (१९) आणि अक्षय शर्मा (२४) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांचा अजून एक साथीदार दिनेश दुमडिया मात्र फरार आहे. साकीनाका पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत […]

Continue Reading 0
arrested

बसमध्ये गर्दीचा फायदा घेवून हातसफाई करणाऱ्या त्रिकुटाला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बसमधील गर्दीचा फायदा घेवून हातसफाईने चोरी करणाऱ्या टोळीच्या तिघांना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफान इलियाज खान, रियाजुद्दीन करीममुल्ला सय्यद, सिकंदर मोहम्मद युनुस अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नोव्हेंबर महिन्यात घाटकोपर येथे राहणारे व्यावसायिक असल्फा येथून घाटकोपर येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. बस आल्यावर त्यांनी आपल्या जवळील कागदपत्रे आणि पैसे […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत व्यावसायिकाचा गळा चिरून खून

पवई तलावाजवळ एका ४० वर्षीय फळ-भाजी विक्रेत्याचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. त्याच्या अंगावर वार आणि जखमांच्या खुणा आहेत. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चांदशहावाली दर्गाच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याचही माहिती प्राप्त झाली होती. […]

Continue Reading 0
arbaz PPS chain snatching

सोनसाखळी चोराला तुटलेल्या आरशावरून पवई पोलिसांनी केली अटक

हिरानंदानी परिसरात आपल्या मित्रांसोबत आलेल्या एका तरुणाची सोनसाखळी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पवई पोलिसांनी केवळ मोटारसायकलच्या तुटलेल्या आरशावरून अटक केली आहे. अरबाज कुतुबुद्दीन अत्तर (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून, मुंबईत विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. भांडूप येथे राहणारा २० वर्षीय तरुण यशपाल बालोर आपल्या मित्रांसोबत […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!