पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या पवईतील १२ वर्षीय अयान शांकता याच्या पर्यावरणासंबंधित कठीण समस्यांवर उपाय काढण्याच्या प्रकल्पासाठी ‘२०२१ इंटरनॅशनल यंग इको-हिरो’च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अयान याने ‘पवई तलावाचे संवर्धन आणि पुनर्वसन‘ यासाठी ८-१४ वर्ष वयोगटात तिसरे स्थान पटकवले आहे. अयान हा जगभरातील २५ तरुण पर्यावरण कार्यकर्त्यांपैकी एक असून ‘अॅक्शन फॉर नेशन’ने त्याला इंटरनॅशनल यंग […]
पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]
@प्रतिक कांबळे कोरोना विषाणुचा झपाट्याने होणारा प्रसार आणि त्यात भासणारा रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेता पवईतील आयुष्य फांऊंडेशन संघटनेच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाबाई आंबेडकर नगर २ येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित या शिबिरात १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात सायन रुग्णालयाची रक्तपेढी लाभली होती. पेढ्यामध्ये असणारा अपुरा […]
@अविनाश हजारे | पवईतील गणेशनगर येथील एकमेव रेशनिंग दुकान शिधावाटप प्रशासनाने इतरत्र हलवल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, याविरोधात आता नागरिकांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. भांडूप शिधावाटप कार्यालय अंतर्गत असलेल्या ३० ई ९५ व ३० ई ९६ ही दुकाने पवईतील गणेशनगर भागात अनेक वर्षांपासून कार्यरत होती. टाळेबंदीच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात […]
परदेशी नागरिक असणारी एक ५० वर्षीय महिला पोलिसांना पवईत मृतावस्थेत मिळून आली आहे. गुरुवार, १५ जुलैला संध्याकाळी चैतन्यनगर भागात ही महिला तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत पोलिसांना मिळून आली. स्थानिक रुग्णालयात किडनीच्या आजारामुळे ती डायलेसिस घेत होती. प्रथमदर्शनी तिचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियन नागरिक […]
एकीकडे कोविड -१९ सारखा साथीचा आजार जनजीवन उध्वस्त करीत आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर काहींनी घरातील कमावता माणूसच गमावला आहे. अशात पवई स्थित शैक्षणिक कार्य करणारी स्वयंसेवी संस्था विद्या मुंबई अशा कुटुंबाला किराणा सामान आणि शिजवलेले अन्न वाटप करत आधार देण्याचे काम करत आहे. कोरोनामुळे सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील बेरोजगारांमध्ये, स्थलांतरित […]
पेट्रोल आणि डिझेल महागले असताना एवढे महाग इंधन खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये मिठाई वाटून कॉंग्रेसचा निषेध. सरकार मोठ्या प्रमाणात आकारत असलेल्या कराबाबत लोकांमध्ये जनजागृती केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात सोमवार, १२ जुलै रोजी विक्रोळी तालुका कॉंग्रेस आणि वॉर्ड १२२च्या वतीने पवईतील आयआयटी मेनगेट येथील पेट्रोल पंपाजवळ निषेध करण्यात आला. […]
यंदाच्या बोधमार्ग फाऊंडेशनच्या डिजीटल अंतर्वारीमध्ये माईंचा सहभाग माईसोबत मनाची डिजीटल अंतर्वारी जगभरातील विविध भाषिक तरुणाईचा उत्फुर्त प्रतिसाद यंदा डिजीटली अनुभवा मनाची ‘बोधवारी’ बोधमार्ग फाऊंडेशनतर्फे १२ जुलै ते २० जुलै दरम्यान ऑनलाईन अंतर्वारी अर्थात बोधवारी साजरी करण्यात येत आहे. या वारीला हजारो लेकरांची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ या आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. बोधमार्ग फाऊंडेशनचे संस्थापक […]
पवईतील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी परदेशी नागरिक असल्याचे भासवत सोशल माध्यमात बनावट खाते बनवून, मैत्री करून नंतर मोबाईलवर संपर्क साधत भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत म्हणून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने २०.४७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना पवई पोलिसांनी शनिवारी नोएडा, उत्तरप्रदेश येथून बेड्या ठोकल्या आहेत. राहुल विनोद तिवारी (वय २१ वर्ष), आसिम समशाद हुसेन (वय २३ […]
पवईतील सर्वात जुन्या असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये सोमवार, २१ जून रोजी ७वा ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगाचे धडे गिरवले. शिक्षक आणि योगा इन्स्ट्रक्टर कोमलम सुनील आणि आर्ट ऑफ लिविंगच्या योगा इन्स्ट्रक्टर निवेदिता घोशाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]
शुक्रवार, १८ जून रोजी पवई तलावात एका पंच्चावन वर्षीय पुरुषाचा मृतदेह पवई पोलिसांना मिळून आला आहे. शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेले असता बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी आलेल्या लोकांना एक मध्यम वयाच्या पुरुषाचे शरीर पाण्यावर निश्चल पडलेले आढळून आले. याबाबत माहिती मिळताच […]
मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या पवई तलावाचे मुख्य आकर्षण म्हणजे यात असणाऱ्या मगरी. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून, अशा आशयाचे बोर्ड सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे लावण्यात आले आहेत. पवई तलाव सौंदर्यकरण प्रकाल्पापूर्वी येथे असणाऱ्या छोट्या छोट्या टेकड्यांवर या मगरींचे नियमित दर्शन घडत असे. मात्र, पाठीमागील काही वर्षात त्यांची ही ठिकाणे हरवल्याने मगरींची दर्शन दुर्लभ […]
पाठीमागील काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने पवई तलाव शनिवारी संध्याकाळी ओसंडून वाहू लागला. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २४ दिवस आधीच तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाची निर्मिती १८९० मध्ये करण्यात आली. मुंबईतील मोठ्या कृत्रिम तलावांपैकी पवई तलाव एक आहे. या तलावाचे पाणी मुख्यत: औद्योगिक कामांसाठी वापरले […]
भूस्खलन झाल्याने इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना पवईमध्ये शुक्रवार सकाळी घडली. सुदैवाने येथे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद झाली नसून, काही गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे. पवईतील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी भूस्खलन झाल्याने सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. जवळपास १० मीटरपर्यंत जमीन धसल्याची घटना घडली आहे. कोरोना रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी येथे कोविड केअर सेंटर (सिसिसि) […]
पवईचे बहुजनवादी नेतृत्व आणि दिन-दुबळ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढणारे प्रकाश (बाबा) बिऱ्हाडे यांनी आज, गुरुवार १० जून रोजी बहुजन वंचित आघाडी पक्षात प्रवेश केला. बहुजन वंचित आघाडीचे पार्लमेंटरी सदस्य मा. अशोकभाऊ सोनोने यांच्या हस्ते बिऱ्हाडे यांचा पक्ष प्रवेश पवईतील डॉ. आंबेडकर उद्यान परिसरात पार पडला. यावेळी नवी मुंबई निरीक्षक मा. आनंद जाधव, वसई विरार निरीक्षक मा. रामेश्वर […]
पवई तलाव परिसरात तयार करण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बरोबरच सौंदर्यकरण कामाचा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पाहणी केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या पर्यटनस्थळापैकी एक महत्वाचे ठिकाण असणाऱ्या पवई तलाव […]
सध्याच्या काळात सायबर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, दररोज कोणी-ना-कोणी त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहे. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून तांत्रिक मदतीने गुन्हे करत असल्याने त्यांना पकडणे म्हणजे एक दिव्यच असते. मात्र भल्या भल्या गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत वठणीवर आणणाऱ्या मुंबई पोलिसांनी या सायबर चोरट्यांना सुद्धा वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. पवई पोलिसांनी अशाच प्रकारे सायबर […]
वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या या पुलाच्या निर्मितीचे काम अवघ्या ५ महिन्यात आणि पावसाळापूर्व पूर्ण करत नागरिकांचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पवई आणि आरे कॉलनीला जोडणारा मिठीनदीवरील नवीन पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्थानिक आमदार रमेश लटके यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन आज, बुधवार, २ जूनला पार पडले. यावेळी विधानसभा संघटक, उपविभागप्रमुख […]
मुंबई कॉंग्रेस विक्रोळी विभागातर्फे २० मे रोजी पवई इंग्लिश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोव्हीड – १९ संक्रमणांच्या वाढत्या संख्येविरूद्ध लढा देण्यासाठी मदत करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्यकारी अध्यक्ष चरणसिंह सप्रा, मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष […]
