काल (२१ फेब्रुवारीला) झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२२ जो पवईचा सर्वात मोठा भाग व्यापतो यातून मोठ्या प्रमाणात मतदारांनी घरातून बाहेर निघत मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. या प्रभागातून ३१८७३ मतदारांपैकी १६७१६ मतदारांनी आपले कर्तव्य बजावल्याने ५२.४४% मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता पवई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवल्याने शांततेत मतदान पार पडले. मुंबई महानगरपालिकेच्या […]
Archive | news
विदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
सौदी अरेबियात मोठ्या पगाराची नोकरी लावून देतो असे सांगून, अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळक्यातील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. वलीउल्ला बेतुल्ला कुरेशी असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील ही दुसरी अटक आहे. जानेवारी महिन्यात यातील पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली […]
निरंजन हिरानंदानी यांच्या नावे बनवले बनावट सोशल नेटवर्किंग अकाऊंट
बांधकाम व्यवसायातील प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या नावाने इंटरनेटवर विविध सोशल नेट्वर्किंग अकाऊंट सुरु करून त्यातून एक अज्ञात व्यक्ती निरंजन हिरानंदानी असल्याचे भासवून लोकांशी आणि मित्रांशी चर्चा करत असल्याची तक्रार नुकतीच पवई पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. हिरानंदानी समूहाच्या माहिती – तंत्रज्ञान विभागातर्फे ही तक्रार नोंद करण्यात आली आहे. हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी […]
पवईत तोतया पोलिसाला अटक
“तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे आणि आम्ही तुला अटक करायला आलो आहोत” असे सांगून, खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तोतया पोलिसांच्या दुकलीतील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. विजय तटकरे असे अटक आरोपीचे नाव असून, अशाच प्रकारच्या एका प्रकरणात १२ वर्षापूर्वी साकीनाका पोलिसांनीही त्याला अटक केली होती. एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे पंचेचाळीस वर्षीय […]
चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले पवई इंग्लिश हायस्कूलचे स्नेहसंमेलन
@सुषमा चव्हाण आयआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन “रिफ्लेक्शन” मंगळवारी अय्यप्पा मंदिरा समोरील मोकळ्या मैदानात दणक्यात पार पडले. यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत शर्मा यांच्या मातोश्री श्रीमती सुनितादेवी गोपाल शर्मा, सून सौदामिनी शर्मा व भारतीय सशस्त्र सेनेचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी […]
घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चांगला, टापटिपीत पेहराव करून, मोठ्या घरातील इसम असल्याचे भासवत मोठ्या इमारतींमध्ये प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र सुरावत (२१) असे अटक आरोपीचे नाव आहे. उमा मल्होत्रा मरोळ येथील अशोक टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील घरात आपल्या परिवारासोबत राहतात. २ जानेवारीला काही कामानिमित्त त्या घराबाहेर गेल्या होत्या. परत आल्यावर […]
तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना अटक
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयआयटी, चैतन्यनगर येथे पाच तरुणांवर प्राणघातक हल्ला करून व चोरी करून पसार झालेल्या टोळीच्या एका म्होरक्यासह अजून एकाला पवई पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. १ जानेवारीला आयआयटी येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी संगनमत करून एका टोळक्याने धारदार शस्त्राने पाच तरुणांवर प्राणघातक हल्ला चढवत त्यांना गंभीर […]
पवईत गर्दुल्यांचा पाच तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला
नववर्षाच्या पूर्वसंध्येला नशेत गुंग झालेल्या ८ ते १० नशेखोर गर्दुल्यांच्या टोळीने, आयआयटी भागात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाच तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवत भोकसून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रात्री २ वाजता घडली. प्रदिप भदरगे (२८), विकास धिवार (३२), नितीन गच्छे (२७) आकाश ओव्हाळ, (२१) अक्षय सोणावणे (२४) असे जखमी झालेल्या तरूणांची नावे आहेत. सर्व तरूण […]
आयआयटी कॅम्पसमध्ये डबक्यात बुडून मुलाचा मृत्यू
आयआयटी, पवई येथील एका डबक्यात पडून एका ३ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी १०.३० वाजता आयआयटी कॅम्पसमध्ये घडली. सार्थक चंद्रकांत येवले असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत. आयआयटी तंत्रज्ञान संस्थेत काम करणारे व इंदिरानगर येथील रहिवाशी विकास कमलापुरकर हे आपला भाचा […]
चांदिवलीतील क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
@सुषमा चव्हाण चांदिवली म्हाडा येथील स्व.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या भव्य क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार मा.संजय पोतनीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला. पवई, चांदिवली भागात मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानांच्या उपलब्धतेची मोठी समस्या आहे. ज्या जागा मैदाने म्हणून राखीव आहेत त्यांची एकतर वाईट अवस्था आहे आणि काही जागांवर […]
पवई तलाव दुर्घटना अपघात कि घात?, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पवई तलावात झालेल्या अपघातानंतर अखेर तीन दिवसांनी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे राजकीय गोटातील मोठे संबंध, भोईर याच्याकडे सापडलेली परवानाधारक बंदूक आणि त्याच्या जीवाला असणारा धोका, यामुळे या घटनेच्या तपासाला अजून एक नवी दिशा मिळली असून, ही दुर्घटना अपघात कि घातपात यादृष्टीने सुद्धा पोलिस तपास करत आहेत. […]
हॉस्पिटल सर्कलला गोपाल शर्मा यांचे नाव
हिरानंदानी हॉस्पिटल येथील सर्कलला गोपाल चंद्रभान शर्मा यांचे नाव देण्यात आले आहे. स्थानिक आमदार आरिफ नसीम खान, विविध क्षेत्रातील मान्यवर व शर्मा परिवाराचे सदस्य यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी हा नामकरण सोहळा पार पडला. शर्मा परिवार आणि पवई यांचे एक अतूट नाते आहे. आता पवई म्हणून विकसित झालेल्या अनेक भागाची जमीन पूर्वी चंद्रभान शर्मा यांचा मालकीची […]
आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मारामारी, चौघांना अटक
मूड इंडिगोसाठी आयआयटी कॅम्पसमध्ये राजस्थानच्या कोटा भागातून आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यामध्ये प्रेमप्रकरणातून हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत पवई पोलिसांनी कारवाई करत मारामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. उत्कर्ष शर्मा (२०), दिवांज चौधरी (२०), जुनेद खान (१९), शुभम पांडेय (१८) अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर काळात पवईतील आयआयटी मुंबई […]
मारूतीच्या विटंबनेवर वाघ गरजला, मूड इंडिगो प्रशासनाने दिला लेखी माफीनामा
आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये हिंदूचे दैवत मारुतीचे स्टुडेंट एक्टीविटी सेंटरमध्ये काढलेल्या विटंबनात्मक चित्रावर शिवसेनेच्या वाघांनी टाकलेल्या डरकाळीमुळे मूड इंडिगो प्रशासनाने केवळ ते चित्र पांढऱ्या पडद्यामागे न लपवता लेखी स्वरुपात माफीनामा सुद्धा लिहून दिला आहे. यामुळे शिवसेनेच्या वाघांचा दरारा आजही कायम असल्याचे स्पष्ट होते. डिसेंबर महिना म्हणजे कॉलेजियन्ससाठी फेस्टिवल मूड असतो. या सर्वात सर्व कॉलेज […]
आयआयटीत तीन दुकाने आगीत जळून खाक
@रविराज शिंदे, रमेश कांबळे पवई, आयआयटी मेनगेट येथील गोखलेनगर परिसरात रविवारी लागलेल्या आगीत येथील फुटपाथवर असणारी तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. शोर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी, गोखलेनगर परिसरात असणाऱ्या फुटपाथवर ज्यूस […]
पवई तलावात बोट उलटून ८ जण बुडाले, ५ जणांना वाचवण्यात यश
पवई तलावात बोट उलटून ८ जण बुडाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यातील ५ जणांना वाचवण्यात स्थानिक आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. तर ३ जणांचा शोध शनिवारी संध्याकाळ पर्यंत चालूच होता. बुडालेले सर्व हे मुंबईतील विविध भागातील रहिवाशी असून, पवई तलावातील हाउस बोटवर पार्टी करण्यासाठी आले होते. या घटनेवरून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे की […]
आयआयटी मुंबईला ‘प्रथम’ संदेश मिळाला
आयआयटी मुंबईने सोडलेल्या ‘प्रथम’ या उपग्रहाकडून तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून संदेश मिळत नव्हते. शनिवारी, १७ डिसेंबरला या उपग्रहाने दिवसभरात तीन वेळा संदेश दिल्याने आयआयटी कंपासमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. आता पर्यंत मिळालेल्या संदेशांपेक्षा शनिवारी मिळालेले संदेश हे अधिक शक्तिशाली असल्याचे उपग्रह टीमचा प्रमुख रत्नेश मिश्रा याचे मत आहे. आयआयटी मुंबईच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या प्रथम उपग्रहाचे […]
पवई तलाव परिसर उजळणार एलईडी दिव्यांनी; पर्यावरणवादी संस्थांची सौर एलईडी दिव्यांची मागणी
विदेशी पर्यटकांसह मुंबईकरांचे आकर्षण असलेला पवई तलाव परिसर येत्या काही दिवसात एलईडी दिव्याने उजळणार आहे. पवई तलाव सुशोभिकरणाच्या वेळी हे एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. या कामासाठी ७.५ कोटी खर्च येणार असून, दोन कंत्राटदारांची निवड सुद्धा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपल्या कॅमेऱ्यात येथील दृश्यांना कैद करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. मात्र, पर्यावरणवादी संस्था पॉज […]
अक्षरधाम रोडचा नारळ फुटला; कामाची सुरवात कधी? : पवईकर
हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत फोडला गेला होता. आता त्याला एक महिना उलटून गेल्यानंतर काम सुरु झाले नसल्याने “नारळ फुटला, आता कामाची सुरुवात कधी?” असा सवाल येथून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून आणि पवईकरांकडून विचारला जात आहे. जवळपास गेली १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी […]
पवई तलाव वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची पवईकरांशी चर्चा
पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या घाण पाण्यामुळे पवई तलावाचे होणारे प्रदूषण तसेच त्याच्या सुशोभिकरणावेळी घ्यावयाच्या उपाययोजना आणि नियोजनबद्द कामावर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या हायड्रोलिक विभागाच्यावतीने त्यांच्या भांडूप येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पॉज मुंबई संस्थेचे सुनिश सुब्रमण्यम, निशा कुंजू, यंग इन्वायरमेंट संस्थेच्या ईलसी गेब्रील, आशा संस्थेचे पदाधिकारी आणि पवईकर उपस्थित होते. हायड्रोलिक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]