चांदिवलीतील क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

@सुषमा चव्हाण 

चांदिवली म्हाडा येथील स्व.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ  उभारण्यात आलेल्या भव्य क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार मा.संजय पोतनीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

पवई, चांदिवली भागात मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानांच्या उपलब्धतेची मोठी समस्या आहे. ज्या जागा मैदाने म्हणून राखीव आहेत त्यांची एकतर वाईट अवस्था आहे आणि काही जागांवर कोणीतरी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुलांना खेळाचा प्रश्न नेहमीच सतावत असतो. मात्र तरुणाईच्या या प्रश्नाला समजत चांदिवली प्रभाग क्रमांक १५१ चे नगरसेवक ईश्वर तायडे यांनी चांदिवली म्हाडा येथे पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या दोन एकर जागेत मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे ठरवले.

या स्व माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडासंकुल व उद्यानाचा लोकार्पण सोहळा आ.संजय पोतनीस याच्या शुभहस्ते तसेच मा. नगरसेवक ईश्वर तायडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विभाग संघटिका राजश्री देसाई, विधानसभा संघटक एकनाथ घाग, विधानसभा महिला संघटिका मनीषा लोटणकर, उपविभाग प्रमुख सर्वश्री शरद गोस्वामी, भास्कर पाटील, युवासेना विभाग अधिकारी सनी भाई आचरेकर, उपविभाग संघटिका प्रमिला चव्हाण, नगरसेविका सविता शरद पवार, श्रीमती कोमल कमलाकर जामसंडेकर, मनाली मंगेश तुळसकर, अश्विनी मते, नगरसेवक सर्वश्री शरद पवार, अण्णा मलाई, शाखाप्रमुख सर्वश्री सागर भाई तुळसकर, वैभव हांदे, दिनेश खोत, संतोष शेटी, विजू शिंदे, बाबा गायकवाड, विक्की निर्मळ, महिला शाखासंघटिका अलका सागर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

 

 

 

 

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!