शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चांदिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावतीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
चांदिवली विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या या नियोजनात चांदिवलीतील युवा नेतृत्व मनोज (बालाजी) सांगळे यांची विभाग युवा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाठीमागील काही वर्षात युवकांसोबतच पक्षासाठी त्यांच्या कार्याला पाहता त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपविभाग अधिकारी पदी भुनेश आखाडे (शाखा १५६/१५७), सर्वेश जामसंडेकर (शाखा १५८/१५९), ललिता पाटील (शाखा १६०/१६१), शैलेश शेंडे (शाखा १६२/१६६), शुभम कांबळे (शाखा १६३/१६४) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यासोबतच विधानसभा समन्वयक, उपविधानसभा समन्वयक, विधानसभा चिटणीस, शाखा युवाधिकारी, शाखा समन्वयक यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या कामाला बघून कायम करण्यात येणार आहे.
No comments yet.