खासदार पवई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबईतील, पवईतील असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. खासदार खेळ महोत्सव २०२२ अंतर्गत स्थानिक खासदार मनोज कोटक यांच्यातर्फे पवई तलाव भागात या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनचे व्यवस्थापन निसर्ग स्वास्थ्य संस्थेतर्फे करण्यात आले होते.
फिटनेस राखण्यात मॅरेथॉन किंवा धावणे महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच याबाबत जनजागृती निर्माण झाल्याने शनिवारच्या कार्यक्रमात चांगला सहभाग पाहायला मिळाला. ५ किमी अंतराची ही मॅरेथॉन होती ज्यात मोठ्या प्रमाणात सर्व वयोगटातील मुंबईकर सहभागी झाले होते.
स्थानिक खासदार मनोज कोटक यावेळी बोलताना म्हणाले, “मॅरेथॉनसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये धैर्य, दृढता, उत्कृष्टता, चिकाटी, विश्वास, वचनबद्धता आणि उत्कटता या मूल्यांचा समावेश होतो. तसेच, लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत.”
यावेळी आयोजकांतर्फे स्पर्धकांसाठी सर्व सोयीसुविधांसह पाणी, एनर्जी ड्रिंक्स, अल्पोपहाराची व्यवस्था याशिवाय वैद्यकीय सोयही करण्यात आली होती.
No comments yet.