उद्या ५ ऑगस्टला मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शाळा व कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जे पाहता शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबईकरांनी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
#Monsoon2019 #BreakingNews
हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या, सोमवार ५ ऑगस्ट रोजी मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यासह पालघर, ठाणे, रायगड,मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी – राज्य शासनाचा निर्णय pic.twitter.com/uP8C7opwWs— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 4, 2019
हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या, सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी पालघर, ठाणे, रायगड,मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. #MumbaiRainsLiveUpdates #MCGMUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 4, 2019
No comments yet.