पवईतील युवकांना एक आनंदाची बातमी आहे. युवकांसाठी रोजगार निर्मिती प्रशिक्षणाची सुवर्ण संधी चालून आली आहे. माजी नगरसेवक चंदन चि. शर्मा यांच्या संकल्पनेतून शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये मोबाईल दुरुस्ती आणि इलेक्ट्रिक दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षणा अभावी वंचित राहिलेल्या युवकांना स्वतःच्या कलेनुसार व्यवसाय करता यावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या काळात अनेक कुशल आणि अकुशल हातानी आपली नोकरी गमावली आहे. अनेक मुले शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे चांगली नोकरी नाही, नक्की काय करायचे हेच समजत नसल्याने घरातच बसून आहेत. अशात देशाच्या आर्थिक उलाढालीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या आणि भविष्य असणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या संकल्पनेतून मोबाईल आणि इलेक्ट्रिक दुरुस्ती प्रशिक्षण शिबीर राबवण्यात येत आहे.
पवईतील सर्व युवकांनी लवकरात लवकर या रोजगार निर्मिती प्रशिक्षणाच्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात नाव नोंदणी करण्यासाठी ९०२२२२२२५७ (902222257) या क्रमांकावर संपर्क साधावा.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.