किडनी रॅकेट: अटक डॉक्टरांना २६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

kidney-racketकिडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या हिरानंदानी रुग्णालयाच्या पाचही डॉक्टरांना शुक्रवारी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक व तीन डॉक्टरांचा समावेश आहे.

जुलै महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात बोगस किडनी रॅकेट उघडकीस आले होते. मुख्य सूत्रधार भैजेन्द्र भिसेनसह विविध ९ आरोपींना पवई पोलिसांनी यामध्ये अटक केली होती. रुग्णालयाचा अवयव समन्वयक कांबळेचा सुद्धा यात समावेश होता.

३ ऑगस्ट रोजी राज्य आरोग्य संचालनालयाने अहवाल देत, या रॅकेटमध्ये काही डॉक्टरांचा समावेश असून, निष्काळजीपणा बाळगल्याचे सांगितले होते. ज्याच्या आधारावर तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजित चटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ अनुराग नाईक, डॉ मुकेश शेटे, डॉ मुकेश शहा व डॉ प्रकाश शेट्टी यांना अटक केली होती. ज्यांना अंधेरी कोर्टाने १३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

आज (शनिवारी) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांतर्फे तपास पूर्ण झाला आहे व त्यांना अधिक पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगण्यात आले. ज्यानंतर न्यायालयाने सर्व डॉक्टर्सना न्यायालयीन कोठडी देत, १६ ऑगस्ट पासून जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे.

दोन डॉक्टरांचा अटकपूर्व जमीन फेटाळला

पवई पोलिसांच्या रडारावर असणाऱ्या हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉ. विना सेवळीकर व सुवीण शेट्टी या दोन्ही डॉक्टरांनी शुक्रवारी दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ज्याबाबत या दोन्ही डॉक्टरांचा ताबा मिळणे आवश्यक असल्याची मागणी सरकारी वकिलांमार्फत करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळला आहे.

या संदर्भात राज्य आरोग्य संचालनालयाचा अहवाल येण्याची पवई पोलीस वाट पाहत आहेत. तो येताच या दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , ,

One Response to किडनी रॅकेट: अटक डॉक्टरांना २६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

  1. Odeyar August 13, 2016 at 4:28 pm #

    Very creative visual. A picture speaks a 1000 words.Just by seeing d visual, you. come to know d full story..You are a real photo journalist. Abhinandan mitra.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!