मुंबईतील साकीनाका परिसरात मनसेतर्फे शिवसेनेला उपहासात्मक संदेश देणारे पोस्टर्स लागले आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मैदानात उतरली आहे. उपहासात्मक पोस्टर लावत ते या मैदानात उतरले आहेत.
‘शिवसेना’ आणि ‘एकनाथ शिंदे गट’ यांच्यातील सत्तेची चढाओढ सुरू असतानाच मुंबईतील साकीनाका परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मनसे सैनिक महेंद्र भानुशाली यांच्यातर्फे हे पोस्टर परिसरात लावण्यात आले असून, “त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत! “आता कसं वाटतंय” !!! असा संदेश पोस्टरवर लिहण्यात आला आहे.
“हा त्यांना जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे ६ नगरसेवक निघून गेले होते. त्यावेळी ते मनसे संपली असे म्हणत होते. मात्र आमचे राजसाहेब ठाम उभे होते आणि मनसे अजून सक्षम आहे. आम्ही असे अनेक नगरसेवक आमदार बनवले आहेत. मनसे नेहमीच हिंदुत्वासोबत होती आणि आहे.” असे यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भानुशाली म्हणाले.
No comments yet.