राज्यात ८६८ कोरोना बाधित; ७० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना बाधित रुग्णांची ० एप्रिल २०२०ची अपडेट

राज्यात आज १२० नवीन कोरोना बाधितांची नोंद झालीराज्यात आज १२० नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. यात मुंबई ५२६, पुणे (शहर व ग्रामीण) १४१, सांगली २५, ठाणे परिसर ८५, नागपूर १७, अहमदनगर २३, यवतमाळ ०४, उस्मानाबाद ०३, लातूर ०८, औरंगाबाद १०, बुलढाणा आणि सातारा प्रत्येकी ०५, जळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिक प्रत्येकी ०२, तर सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशिम, अमरावती, हिंगोली, जालना प्रत्येकी ०१ आणि इतर राज्य ०२. ज्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आज ८६८ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

एकूण ८६८ बाधितांपैकी ७० जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यात ७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, मुंबई येथील ४१ वर्षीय पुरुष ज्याला जादा मद्यपानामुळे यकृताचा आजार होता, आणि ६२ वर्षीय पुरुष ज्याला उच्च रक्तदाब आणि डाव्या अंगाचा परालिसीसचा आजार होता. मुंबईतील एक खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या ८० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. नवीमुंबई येथील एक खाजगी रुग्णालयात असणाऱ्या ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू, त्यांना मधुमेह आणि हृदयरोगाचा त्रास होता. नालासोपारा येथील ९ महिन्याच्या गर्भवती ३२ वर्षीय महिलेचा सुद्धा मृत्यू झाला आहे त्या मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल होत्या. मुंबईच्या सेट जॉर्ज रुग्णालयात एका ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा त्रास होता. तर बांद्रा येथील भाभा रुग्णालयात दाखल असणाऱ्या ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे, यांनाही मधुमेहाचा त्रास होता. यामुळे राज्यातील मृतांची संख्या आता ५२ झाली आहे.

अलगीकरण

सध्या राज्यात ३२,५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत.

निजामुद्दीन येथील मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात गेलेल्यांचा राज्यातील सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत असून, प्राप्त यादीतील व्यक्तींशी संपर्क झाला आहे. या व्यक्तींपैकी ८ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत, तर हिंगोली आणि वाशीम भागातील प्रत्येकी एक व्यक्ती आहे.

English Summary

The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 868

Till now, Mumbai 526, Pune (City & Rural) 141, Sangli 25, Thane Region 85, Nagpur 17, Ahmednagar 23, Yavatmal 04, Osmanabad 03, Latur 08, Aurangabad 10, Buldhana 05, Satara 05, Jalgaon 02, Kolhapur 02, Ratnagiri 02, Nashik 02, Sindhudurg 01, Gondia 01, Washim 01, Amravati 01, Hingoli 01, Jalna 01, Other States 02 such is the detailed count of positive cases for Covid19.

Till date 70 people have been cured and discharged from the hospital.

टीप: येथे देण्यात आलेले आकडे हे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या प्रेस नोट / अधिकृत संकेत स्थळे आणि अधिकृत व्यक्तींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!