पवई तलावाची (Powai Lake) दुर्दशा होत चाललेली असतानाच स्थानिक आमदार (MLA) आणि नगरसेविका (Corporator) यांच्या पाठपुराव्याने पवई तलावाने पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतर्फे (BMC) पवई तलावातील जलपर्णी (water hyacinth) काढण्याच्या कामाला आमदार दिलीप मामा लांडे (MLA Dilip Mama Lande) यांच्या हस्ते सोमवारपासून सुरुवात झाली असून, आमदार लांडे यांनी आठवड्याभरानंतर आज, २३ जानेवारीला या कामाचा आढावा घेतला. यावेळी अनेक सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधीसह शिवसैनिक उपस्थित होते.
मुंबईकरांचे खास आकर्षण असणारा पवई तलाव आसपासच्या रहिवाशी भागातून सोडले जाणारे घाण पाणी, कचरा यामुळे प्रदूषित झाला होता. ज्यामुळे तलावात जलपर्णीचे साम्राज्य पसरत यातील जलचरांना, जैवविविधतेला (biodiversity) धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत पवईकर या तलावात सोडले जाणारे घाण पाणी त्वरित बंद करून, या तलावाच्या स्वच्छतेची (lake clean-up) मागणी करत होते.
मात्र विविध कारणाने तलावाच्या स्वच्छतेसाठी सुरु असणारी चालढकल अखेर थांबली असून, स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे आणि स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पवई तलावातील जलपर्णी हार्वेस्टरच्या (harvester) माध्यमातून काढण्यास सुरुवात झाली आहे. लांडे यांनी स्वतः तलावात हार्वेस्टर मशीन चालवून या कामची सुरुवात केली होती. याच कामाची आठवड्याभरानंतर रविवारी पाहणी करून आढावा घेतला. तसेच नागरिकांच्या सूचना समजून घेत तलावातील जलपर्णी काढण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तशा आवश्यक सूचनाही केल्या.
पवई तलावाच्या आतील जलपर्णी आणि कचरा काढण्याचे सध्या काम सुरु असले तरी तलावाच्या बाहेर फुटपाथ आणि इतर भागात पर्यटकांनी केलेला कचरा हा तसाच पडून असतो. पवईस्थित निसर्ग स्वास्थ्य मिशन आणि हेल्पिंग हंड्स ऑफ ह्युमीनिटी (एचएचएच) या दोन संस्था रविवारी आणि सुट्यांच्या दिवसात आपल्या स्वयंसेवकांच्या मदतीने हा कचरा उचलण्याचे काम करत असतात. आमदार लांडे यांनी यावेळी मोठ्या उत्साहाने परिसर सफाईच्या त्यांच्या कार्यात सहभाग घेत त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “या तलावाशी अनेकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. काम सुरु आहे म्हणून सोडून न देता स्थानिक नागरिकांच्या सूचना ऐकून योग्य पद्दतीने काम करून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच मी नागरिकांच्या सूचना ऐकून कंत्राटदाराला तशा सूचना केल्या आहेत. तसेच या परिसरातील इतर समस्यांची माहिती घेवून त्यासंदर्भात पाठपुरावा करत आहे.”
यावेळी त्यांनी येथील निसर्ग उद्यानाची सुद्धा पाहणी करून त्याच्या अवस्थेचा आढावा घेतला. कोरोना काळात झालेल्या दुर्लक्षामुळे उद्यानाच्या असणाऱ्या अवस्थेवर त्यांनी नागरिकांचे म्हणणे, या भागात करावयाच्या कामांची माहिती घेतली.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.