अटक आरोपी हा पवईसह अंधेरी- गोरेगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच रस्त्यावरील पेडलर्सना मेफेड्रोनचा पुरवठा करत होता. झडतीत त्याच्याकडून ६० लाख किंमतीचे मेफेड्रोन मिळून आले.
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे, जो मुंबईतील टॉप ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक आहे. आरोपीची दिवसाच्या कोणत्याही वेळी कितीही प्रमाणात मेफेड्रोनची डिलिव्हरी करण्यास सक्षम असल्याची ख्याती आहे.
यासंदर्भात अंमली पदार्थ विरोधी सेलने दिलेल्या माहितीनुसार, ताइवो अयोडोल सॅमसन (३४) असे अटक आरोपीचे नाव आहे, तो तीन वर्षांपूर्वी बिझनेस व्हिसावर भारतात आला आहे. मात्र तो ज्या उद्योगासाठी भारतात आला होता त्याने त्या उद्योगात प्रत्यक्षात एक दिवस देखील काम केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही उलट सर्व पुरावे तो अंमली पदार्थ तस्करीत असल्याचे सूचित करतात.
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे पथक नेहमी प्रमाणे गस्तीवर असताना अटक आरोपी हा आरे जिम्नॅशियम आणि अॅक्टिव्हिटी सेंटरजवळ संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६० लाख रुपये किंमतीचे ४०० ग्रॅम मेफेड्रोन असल्याचे आढळून आले. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो शहरातील मेफेड्रोनचा प्रमुख पुरवठादार असल्याचे उघड झाले.
“आरोपीला मोबाईलवर त्याचे क्लायंट संपर्क साधून ड्रग्जसाठी ऑर्डर देत. त्यानंतर तो त्याच्या स्वत:च्या पुरवठादाराला ती ऑर्डर पुरवठा करायला सांगून नंतर क्लायंटशी पुन्हा संपर्क साधत वेळ आणि ठिकाण निश्चित करे,” असे सेलतर्फे सांगण्यात आले.
ते पुढे म्हणाले, सॅमसनच्या ग्राहकांमध्ये रस्त्यावरील पेडलर्सचा समावेश जास्त होता, ज्यांच्यासाठी तो पसंतीचा पुरवठादार होता. गेल्या तीन वर्षांत, संपूर्ण ड्रग पेडलिंग नेटवर्कला हे समजले होते की दिवसाच्या कोणत्याही वेळी कितीही प्रमाणात आवश्यक प्रमाणात मेफेड्रोनची डिलिव्हरी करण्यास तो सक्षम आहे.”
एएनसी आता सॅमसनच्या पुरवठादाराच्या मागावर आहे, जो भारतीय नागरिक आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही अटकेची अपेक्षा सेलतर्फे वर्तवण्यात आली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.