निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पुन्हा एकदा पक्षाची बांधाबांध सुरु झाली आहे. बांधणीत निवडक आणि वेचक पदाधिकाऱ्यांची वर्णी लागणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खास गोटातून समजत आहे. बांधणी करताना पदाधिकाऱ्याचा तळागाळातील मतदारांशी संपर्क आणि जनमानसातील प्रतिमा पहिली लक्षात घेतली जाणार आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील जिल्हाध्यक्षांची निवड सुरु झाली असून, ईशान्य मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी पवईकर कैलाश कुशेर यांची निवडीची मोठी शक्यता आहे.
मंगळवारच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शरद पवार यांची राजकीय जिद्द पाहूनच आपण साहेबांशी एकनिष्ठ असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. शरद पवार असतील तीच खरी राष्ट्रवादी अशी भावना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार नसल्याच्या आणाभाका देखील खाल्ल्या जात आहेत.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर वेचक पदाधिकाऱ्यांची निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेत ईशान्य मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बांधणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या पवईकर कैलाश कुशेर यांची निवडीची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कैलाश कुशेर हे विद्यमान ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष असून त्यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांची निवड केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून समजत आहे.
ईशान्य मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयातील प्रश्न, जेव्हीएलआर तसेच मेट्रो उभारणीच्यासह वेळोवेळी स्थानिक नागरिकांचे सोडवलेले प्रश्न, तसेच कचरा समस्या सोडविण्यासाठी कुशेर यांनी प्रयत्न केले आहेत. कुशेर यांनी येथील स्थानिक प्रश्न थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या दालनापर्यंत नेत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे येथील स्थानिक देत आहेत. त्यामुळे ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदी कैलाश कुशेर यांची वर्णी लागेल असे चित्र आहे.
No comments yet.