पवई इंग्लिश हायस्कूल (पीईएचएस), प्राथमिक विभागाने आणखी एक विक्रम नोंदविला आहे. यावेळी ‘बेस्ट स्कूल’चा मुकुटावर आपले नाव कोरले आहे. ४६ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यांच्यावर मात करत पीईएचएसने हा सन्मान आपल्या नावे केला आहे.
पीईएचएसच्या बिन्नू नायर यांनी आपल्या शालेय यशाबद्दल आवर्तन पवईशी बोलताना सांगितले “पीईएचएसला त्याच्या वचनबद्धतेसाठी, स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे समर्पण आणि २०१९ – २०मधील अभ्यासक्रमातील उपक्रमांबद्दलचे प्रदर्शनाबद्दल सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्काराने गौरविण्यात आले याचा आम्हाला अभिमान वाटतो. आठ प्रथम पारितोषिके, तीन द्वितीय पारितोषिके दोन तृतीय पारितोषिके, एक प्रथम प्रोस्ताहन पुरस्कार आणि द्वितीय प्रोत्साहन पुरस्कार. मेमरी टेस्ट, पाठ वाचन, कथा कथन, रेखाचित्र, कोलाज स्पर्धा. अशा विविध स्पर्धात विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कौशल्यासाठी आम्हाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.”
मुख्याध्यापिका लता प्रसाद पिल्लाई यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या, “पीईएचएसने सर्वोत्कृष्ट शाळेचे सन्मान मिळविण्याचे हे सलग नववे वर्ष आहे.” मुंबई महानगरपालिकेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उपशिक्षण अधिकारी कीर्तिनाथन, बीट अधिकारी रीना वारके यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
No comments yet.