पवईतील समस्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त एस वॉर्ड यांना निवेदन

पावसाळा तोंडावर असताना पवईतील अनेक कामे रखडली असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विक्रोळी तालुक्याच्यावतीने पालिका ‘एस’ विभाग (भांडूप) येथील नवनियुक्त सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत नागरी समस्या मांडल्या.

यावेळी विक्रोळी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ११९ आणि प्रभाग क्रमांक १२२ विभागातील रखडलेली कामे आणि समस्या या संदर्भात मा. नगरसेवक श्री.चंदन चि.शर्मा आणि मा.नगरसेविका श्रीमती मनीषाताई रहाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवा नेते कैलास कुशेर, मुरलीधर खंडागळे, सूरज रिडलांस (वार्ड अध्यक्ष प्रभाग ११९) नियाज भाई शेख, अनिल बिरारे आणि राजू विधाटे उपस्थित होते.

प्रभाग १२२मधील सर्व नाल्यांची, गटारांची पावसाळयापूर्वी दुरुस्ती आणि नाले सफाई करणे. गरीब नगर, इंदिरा नगर, हरिओम नगर, स्वामीनारायण नगर, गौतम नगर, रमाबाई आंबेडकर नगर गुप नं-१ येथील पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याचा दाब वाढवून पाणी पुरवठा सुरळीत करणे. प्रभाग क्रमांक १२२मधील सर्व नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे. पालिकेच्या ‘पेडस्ट्रीअन फस्ट’ पॉलिसीअंतर्गत या प्रभागातील सर्व नादुरुस्त फुटपाथ दुरुस्ती करून नागरिकांना वापरासाठी खुली ठेवणे. अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

तसेच या प्रभागातील डोंगराळ भागात यापूर्वी प्रलयकारी पावसाळयात घरे कोसळून जिवीत व घरांची, मालमत्तेची हानी झाली असल्याने अशा डोंगराळ भागांमध्ये संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी. गुलमोहर बिल्डींग ते ट्रिनिटी बिल्डींग येथील रस्त्याचे कॉकीटीकरण करणे. जैन मंदिर रोड येथील रस्त्याचे कॉकीटीकरण करणे. पावसाळयात दुर्गंधी वाढू नये व रोगराई पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या करिता नियमित किटकनाशक फवारणी करणे. अशा विषयांकडे देखील निवेदनातून लक्ष वेधले आहे.

“शिंदे हे पालिका ‘एल’ विभागात कार्यरत असताना त्यांनी नागरी समस्या सोडवण्यासाठी खूप काम केले आहे. सुदैवाने ते आपल्या विभागाला लाभले या विभागात देखील ते त्यापेक्षा चांगले कार्य करतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला,” असे यासंदर्भात बोलताना कुशेर म्हणाले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!