लष्करात अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पवई पोलिसांनी केली अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले होते.

पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, ती आरोपी करण शेट्टी याला एका सोशल मीडिया साईटवर भेटली होती आणि तिथेच त्यांची मैत्री झाली. आरोपीने तिला आपली ओळख करून देताना तो आर्मी अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे वचन देत अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

आरोपींनी वेगवेगळ्या कारणांच्या आधारे तक्रारदाराकडून ₹ १३ लाख रुपये सुद्धा घेतले होते. शेट्टी हा सैन्यात नसल्याचे समोर येताच तिने पोलिसांकडे जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

“तक्रारीनंतर आम्ही कलम ३७६ (बलात्काराची शिक्षा), ४१३ (चोरलेल्या मालमत्तेत व्यवहार करणे), ४२० (फसवणूक), १७१ (फसवणुकीच्या हेतूने सरकारी कर्मचाऱ्याचे वस्त्र परिधान करणे / वापरणे), ५०४ (शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतूपूर्वक अपमान), ५०६ (धमकी देण्याची शिक्षा) नुसार गुन्हा दाखल करून शेट्टी याला अटक करण्यात आली आहे,” असे पवई पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले.

https://www.facebook.com/alinasalonpowaii

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!