@अरित्रा बॅनर्जी
एका दुर्दैवी घटनेत पवईकर चायना व्हॅली रेस्टॉरंटजवळ असलेल्या हिरानंदानी बेस्ट बस आगाराच्या अगदी बाहेर असणाऱ्या गटारात पडून जखमी झाला आहे. रहिवाशी फुटपाथवर चालत असताना गटाराचे झाकण तुटल्याने त्याच्या जागी टाकण्यात आलेल्या जुन्या प्लायवूडच्या तुकड्यावर पाय ठेवल्याने तो तुकडा तुटून ही दुर्घटना घडली.
या संदर्भात आवर्तन पवईशी या घटनेविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, “मी नेहमी प्रमाणे हिरानंदानी येथे कामानिमित्त जाताना पदपथावर चालत होतो. मी बेस्ट डेपोच्या समोरील पदपथावरून चालत असताना गटाराच्या एका झाकणाच्या जागी प्लायवुडचा तुकडा टाकलेला माझ्या नजरेस पडला. गटाराच्या झाकणाच्या जागी प्लायवूड किंवा इतर काही टाकलेले पाहणे मुंबईकरांसाठी अगदी सामान्य आहे. मुंबईच्या रस्त्यावर किंवा पदपथांवर अॅल्युमिनियमचे किंवा प्लायवूडचे झाकण नेहमी पहायला मिळत असते. त्यामुळे कोणतीही दखल न घेताच मी त्याच्यावरून चालत निघालो. मी त्या प्लायवूडवर पाय ठेवताच ते तुटून मी सरळ नाल्याच्या तळाशी पडलो. माझ्या सभोवती आतमध्ये सगळी घाण आणि प्लायवूड तुटून निर्माण झालेल्या मार्गातून माशांचा बाहेर निघण्यासाठी तयार झालेला वेढा होता.”
“आणखी गंभीर बाब म्हणजे, मी माझ्या एक सहकाऱ्यामुळे बचावलो, मात्र इतर कोणीही यामुळे गंभीर जखमी होऊ शकतो. मुलांसाठी तर हे घातक सिद्ध होऊ शकते. अशी तात्पुरती उपाययोजना करणाऱ्याने पालिकेला याबाबत माहिती देवून, प्लायवुडचे झाकण ठेवण्याऐवजी गटार खुले ठेवले किंवा तसे चिन्ह ठेवून बॅरिकेड केले तर जास्त योग्य उपाय ठरू शकतो. यामुळे पदपथावरून चालणारा पुढे गटर उघडे आहे हे लक्षात येताच आपला मार्ग बदलेल. पालिकेने सुद्धा अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लवकरात लवकर अशी झाकणे लावून घ्यायला हवीत.”
बेस्ट डेपोसमोरील झाकण तुटलेल्या अवस्थेत असण्याची ही पहिलीच वेळ नाही. “यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सकाळी मोठ्या प्रमाणत मोर्निंग वॉकर्स येथून येत-जात असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा धोका आहे.” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
येथून काहीच अतरांवर दोन शाळा सुद्धा आहेत, तरीसुद्धा पालिकेचा निष्काळजीपणा कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतो आहे का? असा संतप्त प्रश्न सुद्धा नागरिकांनी याबाबत उपस्थित केला.
No comments yet.