अक्षय भालेराव आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा. अक्षयच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा मिळावी. यासाठी १८ जूनला पवईमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. भंते शिलबोधी आणी भिखू संघाच्या मार्गदर्शनात काढलेल्या या मोर्चावेळी पवईतील तरुणांनी मदतीचा हात पुढे करत एक लाख दोन हजार ( १,०२,०००₹) रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता.
२५ जूनला पवईतील तरुणांच्या प्रतिनिधींनी अक्षय भालेराव याच्या कुटुंबियांची त्यांच्या गावी बोंढार येथे जाऊन भेट घेत जमा करण्यात आलेला निधी सुपूर्द केला. तसेच त्यांना त्यांच्या या लढाईत सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी प्रतिनिधींनी तपासी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेवून पुनर्जबाब नोंदवून, कसून तपास करत गुन्हेगारांना योग्य शिक्षा देण्याची मागणी केली.
यावेळी भंते शिलबोधी आणी भिक्कु संघ यांच्या समवेत किसन भवाळ, नंदू चौरे, जगनाथ बनसोडे, संतोष चौरे, सतिश बनसोडे, प्रकाश भडर्गे, सय्यद अस्लम, राजू सोनाकांबळे, संजयभाऊ खंडागळे आणी छाया खंडागळे उपस्थित होते. हे सर्व बोंढार या गावी जाऊन मदत करून बुद्ध वंदना घेऊन शहिद अक्षय भालेराव यांना श्रद्धांजली समस्त पवई युवा मोर्चा तर्फे देण्यात आली.
No comments yet.