स्विमिंग पूलमध्ये बुडून १० वर्षीय मुलीचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

स्विमिंग पूलमध्ये बुडून एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई भारतनगर परिसरात राहणारी दहा वर्षीय प्रियांशी पांडे ही आपल्या काही मित्रांसह परिसरात खेळत होती. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास खेळता खेळता आपल्या मित्रांसह ती जवळच असणाऱ्या शिवभग्तानी कॉम्प्लेक्सच्या सुरक्षाभिंतीवरून उडी मारून कॉम्प्लेक्सच्या आत असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये खेळण्यासाठी उतरली.

“अचानक पोरांचा आरडाओरडा ऐकून इमारतीच्या लॉबीमधील सुरक्षारक्षक धावत पुलकडे गेला असता तेथील मुलांनी एक मुलगी तलावात बुडाल्याचे त्याला सांगितले.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “सुरक्षारक्षकाने इमारतीच्या व्यवस्थापन कमिटीला याबाबत माहिती देत पुलमधून मुलीला बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला एका स्थानिक रहिवाशाच्या मदतीने हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.”

पवई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘आवर्तन पवई’शी बोलताना सांगितले कि, “इमारतीच्या आवारात असणारा स्विमिंग पूल हा व्यवस्थापन कमिटी आणि रहिवाशी यांच्या अंतर्गत वादात बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तिथे कोणीच नव्हते. याचाच फायदा घेत बाजूच्या चाळसदृश्य लोकवस्तीत राहणारी काही मुले कॉम्प्लेक्सच्या सुरक्षा भिंतीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या टेकडीवर चढून पाठीमागील ३ – ४ दिवसांपासून भिंतीवरून इमारतीच्या आत उतरून या स्विमिंग पूलमध्ये पोहायला येत होती. माहिती पडताच सुरक्षारक्षक त्यांना पळवून लावत असे.”

“मंगळवारी संध्याकाळी देखील काही मुले येथे पोहायला उतरली. कमी पाण्यात उतरलेली प्रियांशी चालत चालत पुढे जास्त पाण्यात गेल्याने ती बुडाली, असे तिच्या सोबत असलेल्या मुलांनी आपल्या जवाबात म्हटले आहे,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.

यासंदर्भात पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!