शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पवईत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त पवईमध्ये शिवसेना शाखा १२२तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाखाप्रमुख सचिन मदने यांच्यावतीने आणि आमदार सुनिलभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

रविवार, २५ जूनला पवई इंग्लिश हायस्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत आणि पावसाळा निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना यावेळी छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनिलभाऊ राऊत, उपविभाग प्रमुख धर्मनाथ पंत, महिला उपविभाग संघटक स्नेहल मांडे, विधानसभा संघटक निलेश साळुंखे, महिला विधानसभा संघटक विजयता परब उपस्थित होते.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d