साकीविहार रोडवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

साकीविहार रोडवरून प्रवास करणाऱ्या एका ५१ वर्षीय प्रवाशाला भरधाव डंपरने चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पवईत घडली. डंपरखाली आल्याने गंभीर जखमी झाल्याने इसमाचा मृत्यू झाला आहे. संजय कांबळे असे मृत पावलेल्या इसमाचे नाव असून, ते एक्तीवा मोटारसायकलवरून प्रवास करत होते. यासंदर्भात पवई पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवत मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात डंपर चालकास अटक केली आहे.

ऐरोली येथे राहणारे संजय कांबळे हे एल एन्ड टी कंपनीत कंत्राटदार म्हणून काम करत होते. गुरुवारी दुपारी काही कामानिमित्त ते आपली एक्तीवा मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ डीएफ ६०४६वरून साकीविहार मार्गे साकीनाक्याच्या दिशेने प्रवास करत होते. “तुंगा गाव पार केल्यानंतर भरधाव वेगात असलेला डंपर क्रमांक एमएच ४६ एआर ८१३३ याची धडक त्यांच्या मोटारसायकलला बसल्याने मोटारसायकलवरील तोल गेल्याने ते डम्परच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील टायरखाली आले.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “टायरखाली आल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.”

पवई पोलिसांनी यासंदर्भात निष्काळजीपणे आणि हयगयीने गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात भादवि कलम कलम २७९, ३०४ (अ) सह मोटार वाहन कायद्यान्तर्गत गुन्हा दाखल करत डम्पर चालक मकबूल रकुल पटेल (४६) याला अटक केली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!