मोठी बातमी: पंचसृष्टी रोड वाहतुकीसाठी खुला

गुरुवार, २२ जूनला चांदिवली आणि पवई परिसरात चक्काजाम निर्माण झाल्यानंतर अखेर पंचसृष्टी/ राणे सोसायटी रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. चांदिवली – हिरानंदानी परिसराला जोडणाऱ्या या मार्गावर ४ जूनपासून सिमेंट कॉंक्रीटीकरण काम सुरु असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र प्रवाशांचे होणारे हाल पाहता गुरुवारी संध्याकाळपासून वेळेआधीच हलक्या वाहनांसाठी हा रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ट्रक, टेम्पो आणि अवजड वाहनांना येथून प्रवेश असणार नाही.

पंचसृष्टी मार्ग हा हिरानंदानी आणि चांदिवली परिसराला जोडणारा महत्वाचा दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करत असतात. मरोळ, साकीनाका आणि चांदिवली भागातून येणाऱ्या शाळकरी मुलांसाठी या मार्गिकेचा सर्वात जास्त उपयोग होत असतो. तसेच चांदिवली आणि पवई या दोन्ही परिसरातील नागरिक याच मार्गीकेवरून प्रवास करत असतात. मात्र वर्षानुवर्ष विकासक आणि पालिका यांच्या अनुमतीत अडकून पडल्याने हा रस्ता दुरावस्थेत होता. यासंदर्भात स्थानिक नागरिक आणि ‘आवर्तन पवई’ हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते.

जानेवारी २०२१ला स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन देत या मार्गिकेचे ३ टप्प्यात काम विभागले होते. यापैकी गुंडेचा हिल ते क्रीशांग पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे मे २०२२मध्ये पूर्ण करून स्थानिक रहिवाशी आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा दिला होता.

यानंतर आयआरबी ते गुंडेचा हिल भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला राणे सोसायटी  रोडच्या सिमेंटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करून आठवड्याभरात हा रस्ता बनवून तयार करण्यात आला होता आणि रस्ता सुकून मजबुतीसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

मात्र गुरुवारी सकाळी चांदिवली आणि पवईकर नागरिकांना मोठा धक्का बसला कारण हा मार्ग बंद असताना लेकहोम कॉम्प्लेक्समधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना हा खाजगी कॉम्प्लेक्सचा मार्ग बंद करण्यात आला. ऐन शाळेच्या वेळेत हा मार्ग बंद केल्याने पवईकडे निघण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या डीपी रोड ९ मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत संपूर्ण चांदिवली आणि पवई चक्काजाम झाली. कित्येक शालेय विद्यार्थी तासंतास रस्त्यात अडकून पडून वेळेत शाळेत पोहचू शकले नाहीत. अनेक कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचले. दिवसभर संपूर्ण वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने अखेर गडबडीत वेळेआधीच पंचसृष्टी/राणे सोसायटी रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

“आमदार दिलीप मामा लांडे यांनी आम्हाला फोन करून दिवसभर झालेल्या वाहतूक कोंडीच्या परिस्थितीला पाहता आमच्या कॉम्प्लेक्समधून जाणारा रोड खुला करण्याची मागणी केली. हा रस्ता खाजगी आहे तरी माणुसकीच्या नात्याने हलक्या वाहनांसाठी संध्याकाळी रस्ता खुला करत आम्ही स्वतः सुरक्षारक्षक लावून वाहतूक नियोजन केले. ट्रक, टेम्पो आणि अवजड वाहनांना येथून प्रवेश असणार नाही,” असे पंचसृष्टी कॉ हौ सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष इंद्रनील चटर्जी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आजपर्यंत या संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम फेडरेशन पाहत होते. हा खाजगी रस्ता असताना देखील आम्ही कधीच या मार्गावरून वाहतूक रोखली नाही.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!