सदर इसम नामक निपेंद्र महोन्तो (अंदाजे वय ४०) अशोक टॉवर मरोळ येथे आजारी अवस्थेत मिळून आला होता. याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २६ मार्च रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक आजारी इसम मरोळमधील पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या अशोक टॉवर, मारवाह रोड भागात रस्त्याकडेला पडला आहे.
“त्याला मोबाईल वनच्या साहय्याने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्यंत आजारी असल्याने तेथे त्याने कसेबसे त्याचे नाव निपेंद्र महोन्तो असल्याचे सांगितले. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असताना २८ मार्चला त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर इसमाच्या नातेवाईकांचा पवई, मरोळसह महाराष्ट्रभर शोध सुरु आहे. या व्यक्तीबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास पवई पोलीस ठाण्याशी २५७०२६९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पवई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
No comments yet.