मुंबईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आयआयटी कॅम्पसच्या हॉस्टेल नंबर १२च्या पाठीमागे सोमवारी रात्री बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही कॅम्पसमध्ये बिबट्या दिसला होता. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने आयआयटी कॅम्पस परिसरात याआधी देखील अशा प्रकारचा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे. बिबट्या […]
Tag Archives | आयआयटी मुबई
७२ तासांत वसतिगृहे खाली करण्याचा आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना आदेश
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयआयटी मुंबईमधील सर्व विद्यार्थ्यांना ७२ तासांत म्हणजेच शुक्रवार, २० मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी संस्थेच्या सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या ७२ तासांत आयआयटीमधील येण्या-जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा, वसतिगृहे खाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे संचालक सुभाषिश चौधरी […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी पाऊले पडली पुढे
२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्हीचे औचित्य साधत पवई इंग्लिश हायस्कूल ने गुरुवार, २७ फेब्रुवारीला […]
तंत्रज्ञानाच्या नावाखाली सामान्याच्या हातातील काम हिसकावतेय – मेधा पाटकर
‘तंत्रज्ञानामुळे अनेक मानवी हातातील कामे मशिन्सकडे आल्यामुळे तंत्रद्यानाच्या नावाखाली सामान्यांच्या हातातील काम हिसकावले जात आहे, याकडे कोणाचेही लक्ष नाही.” असे मत समाजसेविका मेधा पाटकर यांनी नुकतेच व्यक्त केले. पवई येथील आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये त्या बोलत होत्या. या चर्चासत्रासाठी पाटकर यांच्यासोबत आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी सुद्धा उपस्थित होते. ३ ते ५ जानेवारी […]
पवई इंग्लिश हायस्कुल ४०व्या वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाची ‘झलक’
पवईतील सर्वात जुनी इंग्रजी माध्यमातील शाळा पवई इंग्लिश हायस्कूलने यावर्षी आपली ४० वर्षे पूर्ण केली आहेत. या आनंदाचा भाग म्हणून शुक्रवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात त्यांचा ४०वा वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव “झलक” मोठ्या उत्साहात पार पडला. दोन भागात झालेल्या या शालेय उत्सवात यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध […]
आयआयटी पवईच्या क्लासरूममध्ये भटक्या गाईचा फेरफटका
आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बैलांच्या जोडीने धावपळ करताना एका इंटर्नला जखमी केल्याची घटना अजून ताजी असतानाच, येथील एका क्लासरूममध्ये भटकी गाई घुसल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. भटकी जनावरे येथील विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असतानाच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात प्रशासन गुंतले असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. एका क्लासरूममध्ये लेक्चर सुरु असताना एक गाय त्या […]
विद्यार्थीनीला अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या प्रोफेसरला अटक
मुंबईतील एका नामांकित अभियांत्रिकी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडिया आणि इमेलच्या माध्यमातून मानसिक त्रास देणाऱ्या माजी प्रोफेसरला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने या पीडितेसह अन्य मुलींनादेखील असेच छळले असल्याचे समोर आले आहे. पवईतील एका नामांकित विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडणाऱ्या, तिला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्या विश्वविद्यालयाच्या माजी प्रोफेसरला पवई […]
आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये कोट्यावधीच्या पॅकेजेसचे जॉब ऑफर्स
भरमसाठ पगाराच्या पॅकेजेससाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये १ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत हा टप्पा पार पडला. नेहमीप्रमाणे आयआयटीयन्सला मिळणारे कोट्यवधीचे पॅकेजेस या वेळीही पहायला मिळाले. पहिल्या टप्प्यात प्लेसमेंट प्रक्रियेत निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या टप्यात अकराशे […]
आयआयटी मुंबईच्या पीएचडी विद्यार्थ्यांचे कॅम्पस गेटबाहेर आंदोलन
विद्यार्थी कॅम्पस बाहेर आंदोलन करताना रविराज शिंदे आयआय मुंबईतील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने शुक्रवारी (२१ डिसेंबर) प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे आयआयटीत निषेध रँली सुद्धा काढण्यात आली. यावेळी विविध विषयांवर पीएचडी करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख मागण्यासहित अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी […]
स्टार्टअपची क्रांती देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्टअप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये कॉन्वोकेशन हॉलमध्ये पार पडलेल्या आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते […]
आयआयटीतील मांसाहार वाद बंद करा, युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
@अविनाश हजारे, रमेश कांबळे पवईतील आयआयटी कॅम्पसमध्ये मागील काही दिवसांपासून शाकाहारी- मांसाहारी वाद पेटलेला असतानाच युवासेनेने यात उडी घेत, संस्थेतील सर्व कँटिंगमध्ये सारखीच नियमावली लागू करावी अशी मागणी करणारे निवेदन घेवून सोमवारी आयआयटीत धडक दिली. आयआयटी मुंबईचे कुलसचिव प्रेमकुमार यांची भेट घेवून, त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्याचा […]