Tag Archives | चांदिवली

raheja vihar protest

नशाखोरी रोखण्यासाठी रहेजाकर मैदानात

चांदिवली येथील रहेजा विहार भागात वाढत्या नशेखोरीला रोखण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे, रविवारी येथील रहिवाशांनी मैदानात उतरत धरणे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. बाहेरील भागातून येणाऱ्या मुलांमुळे येथे नशाखोरी वाढत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी लेक साईड इमारत समोरील पालिका मैदानात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत प्रशासना विरोधात हे धरणे आंदोलन केले. जवळपास […]

Continue Reading 0
suicide death

विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापक विरोधात गुन्हा दाखल

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मध्ये शिक्षण घेणाऱ्या रामबाग येथील संकेत तांबे प्राध्यापकांच्या अपमानास्पद बोलण्यानंतर निराशेत असताना सोमवारी आत्महत्या केल्यानंतर पवई पोलिसांनी प्राध्यापकाला समन्स पाठवले आहेत. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवईतील रामबाग येथे राहणारा संकेत तांबे टीसमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याने तिथे जाणे बंद केले होते. याबाबत पालकांनी विचारणा केली […]

Continue Reading 0
suicide

मानसिक तणावातून पवईत दोन तरुणांची आत्महत्या

मानसिक त्रासाला कंटाळून पवईतील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना पाठीमागील दोन दिवसात घडल्या आहेत. पवईतील कॉस्मोपॉलिटिन इमारतीत राहणारा संकेत तांबे याने सोमवारी राहत्या इमारतीच्या ८ मजल्यावरील रीफ्युजी एरियातून उडी मारून आत्महत्या केली. तर फिल्टरपाडा येथे राहणारा तरुण ओम बाली (१८) याने कांजुरमार्ग येथे लोकलखाली आत्महत्या केली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा हुशार विद्यार्थी होता. […]

Continue Reading 0
bike accident

पवईत टेम्पोखाली आल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू

एका मोटारसायकल चालकाचा टेम्पोखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पवईत घडली. साकीविहार रोडवर हा अपघात घडला. मोहम्मद खान (२०) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी टेंम्पो चालक रामसुंदर यादव (२९) याला अटक केली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान आपला अजून एक मित्र मोहम्मद कुरेशी (२०) याच्यासोबत मोटारसायकलवरून […]

Continue Reading 0
2

हिरानंदानीत बिजनेस पार्कच्या मिटर रूमला आग, अग्निशमन अधिकारी जखमी

पवई, हिरानंदानीतील केसिंग्टन बिजनेस पार्कच्या तळमजल्यावर असणाऱ्या मीटर रूमला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासानंतर संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी आगीच्या दाहामुळे किरकोळ जखमी झाला असून, उपचारानंतर […]

Continue Reading 0
bus fire

चांदिवलीत उभी बस जळाली, वाहक किरकोळ जखमी

चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारतीजवळ एक खाजगी बस जळाल्याची घटना आज सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये बसचा वाहक प्रकाश राजकरण (२२) आग विझवण्याच्या धडपडीत किरकोळ जखमी झाला आहे. येथील चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारत आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या इमारतीत काम करणाऱ्या लोकांना घेऊन येणाऱ्या खाजगी बसेस पैकी काही बसेस येथेच रस्त्याच्या किनाऱ्याला उभ्या केल्या […]

Continue Reading 0
IMG_4058

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]

Continue Reading 2

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!