पवई येथील ४० वर्षीय राजेश भारद्वाज याचा खून करून पसार झालेल्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल फोन, सीम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले आहे. नूर युनुस खान (वय २२ वर्ष) आणि सलीम आरिफ खान (वय २१ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. […]
Tag Archives | चाकूने भोकसून खून
झुम कार कंपनीच्या कार चोरी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना अटक; सहा गाड्या हस्तगत
@प्रमोद चव्हाण झुम कार कंपनीची हुंडाई क्रेटा मोटार कार पवई येथून भाड्याने बुक करून, तिचे जिपीएस. सिस्टम काढून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जगदिश सोहनराम बिष्णोई (२३) आणि महेंद्र रतीराम गोदारा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी चोरी केलेल्या ६ गाड्या राजस्थान येथून ताब्यात घेतल्या आहेत. […]
हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’ आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण, शालेय विद्यार्थी आणि पवईकरांनी यात सहभाग नोंदवला. आपल्या सर्वांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच ताजी हवा, हिरवेगार सभोवतालचे वातावरण आणि स्वच्छ पाण्याची गरज आहे. अर्थातच पर्यावरण रक्षण ही सध्या मोठी गरज होवून बसली आहे. […]
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवईमध्ये आंदोलन, मानवी साखळी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान सहा ते सात चर्चांनंतरही सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तोडगा निघू शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पवईमध्ये सुद्धा विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. पवईतील […]
व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला अटक
मुंबईतील विविध व्यापाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांसह त्यांचा मालाचीही लूट करणाऱ्या सराईत भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप अगरवाल उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू जगदीश मखिजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईतील धोबी तलाव भागात राहणारे नरेंद्र तारी यांची सावंतवाडी येथे काजूची बाग आहे. सदर बागेत येणाऱ्या काजूची विक्री करण्यासाठी त्यांचा मुलगा […]
दुकान फोडून दीड लाख किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई येथील तुंगागाव भागातील राम मोबाईल शॉप फोडून त्यातील मोबाईल, ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.४२ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. शादाब मोमीन अन्सारी (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राम प्रसाद नारायण यांचे तुंगागाव येथे राम मोबाईल शॉप नामक मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. १४ […]
बलात्कारच्या गुन्ह्यात एकाला अटक
आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत बलात्कार करणाऱ्या एका इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इसाकी हरिश्चंद्र पांडीधर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी इसाकी आणि तक्रारदार महिला हे दोघेही एकाच लॅबमध्ये काम करतात. लॅबमध्येच त्यांची ओळख […]
पवईत पुलाचा भाग कोसळला; आरेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद
पूल धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. पवईतील आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर असणारा मिठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव […]
लष्करात अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पवई पोलिसांनी केली अटक
पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले […]
तृतीयपंथीयांच्या सन्मानार्थ पवई धावली
@अविनाश हजारे – सर्वच समाजघटकांचा सामाजिक स्तर उंचावत असताना या प्रक्रियेत कायमच दुर्लक्षित राहिलेल्या नव्हे; ठेवल्या गेलेल्या तृतीयपंथी घटकाला समाजात सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. त्यांची समाजातील ओळख नव्याने करून देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ पवई येथे शनिवारी ‘वर्ल्ड वॉकिंग डे’चे आयोजन करण्यात आले. ‘ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल’ या […]
खून करून पसार झालेल्या दोन्ही आरोपींच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चांदिवली येथे खानावळ चालवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोकसून खून करून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. उधारीवर जेवण देण्यास नकार दिला म्हणून हा खून करण्यात आला होता. विपुल सोळंकी (२२) आणि प्रकाश सोळंकी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि अॅक्टिव्हा मोटारसायकल सुद्धा हस्तगत […]