पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग आता हळूहळू मंदावू लागला आहे. २९ मे ते ३ जून २०२० या पाठीमागील ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवार २९ मे रोजी ४ जणांना, शनिवार ३० मे रोजी ६ जणांना, रविवार ३१ मे रोजी ५ जणांना, सोमवार १ जून ३ जणांना, मंगळवार २ जून […]
Tag Archives | न्यूज
पवईतील तीन गरोदर मातांनी कोरोनामुक्त होत दिला गुटगुटीत बाळांना जन्म
गरोदर मातांना कोरोना झाला तर संपूर्ण कुटुंबावर मानसिक तणाव येत असतो. मात्र, पवईतील तीन मातांनी कोरोना व्हायरसवर मात करत कोरोनामुक्त गुटगुटीत बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही माता घरी परतल्या असून, सामान्य जीवन जगत आहेत. कोरोना विषाणूंचा कहर सर्वत्र पसरत असताना गरोदर महिलांना सुद्धा त्यांनी आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना संसर्ग असल्याने आजारावर […]
कोरोना व्हायरसवर मात करत १८ दिवसांचे बाळ झाले बरे, पवईतील रुग्णालयातून डिस्चार्ज
जन्माच्या ३ तासातच बाळाला उच्च तापाची लक्षणे दिसल्याने केलेल्या तपासणीत बाळाचा अहवाल आला होता कोरोना पॉझिटिव्ह. एका १८ दिवसांच्या बाळाने (baby) कोरोना व्हायरसचा (coronavirus) पराभव (defeats) करत कोरोनामुक्त झाल्याची आनंददायी आणि आशादायी बातमी समोर येत आहे. गुरुवारी पवईतील हिरानंदानी रुग्णालयातून बाळाला घरी सोडण्यात आले आहे. सर्वात कमी वयात कोरोना व्हायरसचा पराभव करत घरी परतणारे ते […]
पवईत तीन दिवसात २८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
पवई (Powai) परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह बाधितांचा आकडा २७० वर पोहचला असून, पाठीमागील तीन दिवसात यात २८ बाधितांची भर पडली आहे. यात मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत. एका बाजूला पवईतील बाधितांचा कोरोनामुक्त होत रिकवरी रेट वाढत असतानाच मोठ्या […]
फुलेनगर कोरोना मुक्तीच्या दिशेने, ८५% बाधित बरे होऊन घरी परतले
पवईसह मुंबईत कोरोना बाधितांचा ‘रेड झोन’ म्हणून ओळखले जाणारे पवईतील आयआयटी मार्केटजवळ असणारा महात्मा ज्योतिबा फुलेनगर परिसर आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वी मिळालेल्या बाधितांपैकी ८५% बाधित कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. पवईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद होत असतानाच, पाठीमागील १० दिवसात फक्त ५ बाधितांची नोंद आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर […]
पवईत आज ६ कोरोना बाधितांची नोंद
पवईतील कोरोना बाधितांच्या संख्येने २०० बाधितांचा टप्पा पार केला आहे. सोमवार, २५ मे रोजी यात ६ बाधितांची वाढ झाली आहे. सोमवारी मिळालेल्या बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील दोघे तर अगोदर मिळून आलेल्या बाधिताच्या परिवारातील व्यक्तीचा समावेश आहे. पालिकेतर्फे हे संपूर्ण परिवार सिल करण्यात आले असून, नागरिकांना सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई भोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस […]
न्यूज अपडेट: गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण
न्यूज अपडेट: रविवार २४ मे, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ते पोलीस खात्यात कार्यरत आहेत. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
न्यूज अपडेट: शनिवारी आयआयटी पवई समोरील भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद. आयआयटी पवई समोरील गरिबनगर, चैतन्यनगर, हनुमान रोड, टाटा पॉवर कॉलोनी येथे कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
पवईत आत्तापर्यंत १७८ कोरोना बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट ३८%
पवई परिसरात कोरोना बाधितांचा आकडा हा वाढत चालला असून, २१ मे पर्यंत पवई परिसरात १७८ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात ६६ महिला तर ११२ पुरुषांचा समावेश आहे. या आकड्यात सर्वात कमी मार्च महिन्यात तर सर्वात जास्त ही मे महिन्यात कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यात रिकव्हरी रेट हा ३८% वर […]
एस विभाग हद्दीत ७५५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; १८० जण कोरोनामुक्त
@अविनाश हजारे – मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागांतर्गत येणाऱ्या पवई, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, नाहूर या भागात आतापर्यंत ७५५ रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील १८० जण कोरोनामुक्त झाले असून, डिस्चार्ज देऊन त्यांना घरी पाठवले आहे. तर २१ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पालिकेच्या १८ मे रोजीच्या यादीतून ही गोष्ट उघडकीस आली आहे. पालिका एस विभागाच्या यादीनुसार […]
जेवणाअभावी अलगीकरणातील नागरिकांवर उपासमारीची वेळ; पवई क्वारंटाईन सेंटरमधील प्रकार
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागातील विविध क्वारंटाईन सेंटरमधील लोकांना पुरवण्यात येणारे अन्न अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे येत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र रविवारी तर क्वारंटाईन सेंटरमधील या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. पवई आणि कर्वेनगर येथील इमारतींमधील क्वारंटाईन सेंटरमधील जवळपास २००० नागरिकांवर रविवारी उपाशी राहण्याची वेळ आली. संध्याकाळी ४ पर्यंत जेवण आले नसल्याने संतप्त नागरिकांनी इमारतीखाली […]
सावधान: जेविएलआर रस्त्यावर ऑईल पडले आहे, वाहनचालकांनी काळजी घ्यावी
पूर्व आणि पश्चिम उपनगर यांना जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) ते गांधीनगर या मार्गावर रस्त्यावर गाडीतील ऑईल पडले आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या कामासाठी किंवा इतर कारणांनी बाहेर पडलेल्या वाहनचालकांनी या भागातून प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी. मुंबई अग्निशमन दल आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरु आहे. या […]
पवईत आजपर्यंत ९४ कोरोना पॉझिटिव्ह; आयआयटी फुलेनगर हॉटस्पॉट
बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि मुंबई पोलीस यांच्याकडे नोंदवण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पवईतील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सोमवार, ११ मे पर्यंत ९४ वर पोहचला आहे. बरेच दिवस चाळसदृश्य लोकवस्तीत मर्यादित राहिलेल्या कोरोना विषाणूमुळे पवईतील इमारत भागात राहणारे रहिवाशी सुद्धा बाधित झाल्याचे आता समोर येत आहे. आयआयटी मार्केटजवळ असणारा फुलेनगर कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट झाला आहे. सोमवार अखेरपर्यंत […]
पवईत आतापर्यंत ६५ जणांना कोरोनाची लागण; एकाच दिवसात ९ बाधितांची वाढ
पवईत कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवार ७ मे पर्यंत पवईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे बुधवारी एका दिवसात यात ९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. पाठीमागील काही दिवस केवळ चाळ सदृश्य लोकवस्तीतच कोरोना बाधित मिळत होते, मात्र आता इमारतीमध्ये सुद्धा कोरोना बाधित मिळून येत आहेत. पवई विहार, […]
आयआयटी स्टाफ कॉर्टर्समध्ये अजून एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद
पवईतील एसएमशेट्टी शाळेजवळ असणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉर्टर्समध्ये रविवार, ३ मे रोजी अजून एका कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. पवईतील एका नामांकित रुग्णालयात तो काम करत आहे. यासोबतच येथील बाधितांची संख्या दोन झाली असून, पूर्वी पॉझिटिव्ह मिळून आलेला तरुण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. पवईतील कोरोना बाधितांचा आकडा शनिवार, २ मे पर्यंत ४५ वर […]
आयआयटी फुलेनगर भागात अजून ६ कोरोना बाधितांची नोंद
पवई परिसरातील आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर भागात रविवार, ३ मे रोजी ६ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे या परिसरातील कोरोना बाधितांचा आकडा १३ तर पवई परिसरातील कोरोना बाधितांचा आकडा ५२ झाला आहे. रविवारी मिळालेल्या बाधितांमध्ये यापूर्वी मिळालेल्या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांचा सुद्धा समावेश आहे. पवई परिसरात पाठीमागील काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ […]
पवईत आतापर्यंत ४५ जणांना कोरोनाची लागण; एकाच दिवसात ८ बाधितांची वाढ
पवईत कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शनिवार २ मे पर्यंत पवईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली आहे. यात शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात १२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. नवीन मिळून आलेल्या रुग्णांमध्ये पूर्वी मिळून आलेल्या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांचा सुद्धा समावेश आहे. शुक्रवार, १ मे रोजी आयआयटी […]
पवईत ६ कोरोना बाधितांची वाढ; कोरोना बाधितांचा आकडा ३३
पवईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी, ३० एप्रिलला हा आकडा ३३ वर पोहचला आहे. बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसात ६ रुग्णांची यात वाढ झाली आहे. बाधित रुग्णांमध्ये ३ रुग्ण वैद्यकीय कर्मचारी, १ पोलीस कर्मचारी तर एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. मुंबईकरांचे नेहमीच खास आकर्षण राहिलेला पवई परिसर आता रेड झोनमध्ये पोहचला आहे. […]
पवईतील १० कोरोना बाधितांचा अहवाल निगेटिव्ह, सोडले घरी
कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या कोव्हीड १९ या आजारावर मात करत पवईतील १० बाधित आता घरी परतले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुढील १४ दिवसांसाठी ते घरीच अलगीकरणात असणार आहेत. ही एक मोठी दिलासादायक बातमी पवईकरांसाठी आहे. महाराष्ट्र राज्यासह मुंबई आणि पवईतही कोरोनाने थैमान मांडले आहे. मंगळवार २८ एप्रिल पर्यंत या […]