Tag Archives | पवई बातम्या

पवई तलावाची बत्ती गुल, प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत

पवईची वाढती लोकप्रियता आणि पर्यटन स्थळ म्हणून मुंबईकरांचा ओढा पाहता मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे, परंतु जवळपास एक महिन्यापासून या सुशोभिकरण करण्यात आलेल्या परिसरात बनवलेल्या पदपथावरील दिवेच बंद पडलेले आहेत. त्यामुळे पवईच्या राणीचा नेकलेस चोरीला गेली कि काय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलेला […]

Continue Reading 0

गलेरियाला महानगरपालिकेचा दणका, दुकानाबाहेर वाढवलेल्या जागेला त्वरित हटवण्याची नोटीस

हिरानंदानीतील गलेरिया शॉपिंग मॉलमधील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात व समोरील मोकळ्या जागेत बदल करून आपली दुकाने वाढवल्यामुळे मॉलची दुर्दशा झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आता ते या मॉलकडे दुर्लक्ष करून आसपासच्या परिसरात असणाऱ्या मॉल्समध्ये खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत. या बद्दल राष्ट्रवादीचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंग यांनी पालिकेकडे तक्रार केली […]

Continue Reading 0
ramabai kachra cleaning

प्रशासनाला आली जाग, रमाबाई नगरचा मलबा झाला साफ

आयआयटीमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात, गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार, यांनी उरलेला मलबा टाकून परिसरात घाण पसरवली होती. कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे तर मुश्कील झालेच होते; परंतु आजार पसरून परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त झाले आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, […]

Continue Reading 1
a

रमाबाई नगरला आजाराचा विळखा, स्थानिक प्रतिनिधीं कानाडोळा करत असल्याचा स्थानिकांचा आरोप

पवई, आयआयटी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार मलबा टाकून परिसरात घाण पसरवत आहेत. या कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे मुश्कील झाले असून, परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस […]

Continue Reading 0
suicide

आजाराला कंटाळून हिरानंदानीत घरकाम करणाऱ्या मुलीची आत्महत्या

हिरानंदानीतील हेरिटेज इमारतीत घरकाम करणाऱ्या श्रद्धा गायकवाड (बदलेले नाव) या १९ वर्षीय मुलीने आजाराला कंटाळून तेराव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याची घटना पवईमध्ये काल सकाळी घडली. पवई पोलिसांना ती काम करत असलेल्या घरात तिने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली असून, तिने निराशेतून आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीतून समोर येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आत्महत्येमुळे मात्र […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!