Tag Archives | पवई मुंबई

पवईतून ४.२० लाखाच्या गांजासह एकाला अटक

मुंबईत गांजाच्या तस्करीसाठी आलेल्या पुण्याच्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मंगळवारी अटक केली. त्याच्याकड़ून २१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदली बशीर अहमद अन्सारी (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट (एनडीपीएस) कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मादक […]

Continue Reading 0
birthday with street kids

रस्त्यावरील बेघर मुलांसोबत वाढदिवस

आपला वाढदिवस आप्तस्वकीयांसोबत सेलिब्रेट करणारे अनेक नजरेस पडतात. मात्र गरीब गरजू, बेघर आणि रस्त्यावरील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरे करणारे क्वचितच. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली एकमेकांपासून लोक लांब पळत असतानाचा पवईतील एका तरुणीने चक्क रस्त्यावरील बेघर मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. पवईतील तुंगागाव येथे राहणारी तरुणी हर्षु पवार हिचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. सर्वसामान्याप्रमाणे […]

Continue Reading 0
fire water tanker

पवईत पाण्याच्या टँकरला आग

पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) धावत्या पाण्याच्या टँकरला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांच्या मदतीने दुसऱ्या एका टँकरमधील पाणी वापरून आग विझवण्यात आली. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका वॉटर सप्लाय कंपनीचा टँकर हा पाणी घेवून जेविएलआर वरून अंधेरीच्या दिशेने जात होता. मरीन इन्स्टिट्यूट […]

Continue Reading 0
maratha morcha

मराठा आरक्षणासाठी पवईत आंदोलन

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पवईसह मुंबईत विविध ठिकाणी रविवारी आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाजाने रस्त्यावर उतरत आंदोलने केली. पवईतील आयआयटी मेनगेट समोर मराठा समाजांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, जोपर्यंत स्थगिती उठविली जात […]

Continue Reading 0
achrekar

एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी विभास आचरेकर

@अविनाश हजारे | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस विभागाचे’ सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या बदलीनंतर बरेच दिवस रिक्त असणाऱ्या सहाय्यक आयुक्तपदी विभास आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. एस विभाग प्रशासनाच्या हद्दीत मुख्यत्वे पवई, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर आदी. परिसर येतात. पालिका ‘एफ साऊथ’ ( परेल) विभागात ते यापूर्वी कार्यरत […]

Continue Reading 0
fulenagar mukesh trivedi

फुलेनगर कोरोना मुक्तीच्या दिशेने, ८५% बाधित बरे होऊन घरी परतले

पवईसह मुंबईत कोरोना बाधितांचा ‘रेड झोन’ म्हणून ओळखले जाणारे पवईतील आयआयटी मार्केटजवळ असणारा महात्मा ज्योतिबा फुलेनगर परिसर आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वी मिळालेल्या बाधितांपैकी ८५% बाधित कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. पवईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद होत असतानाच, पाठीमागील १० दिवसात फक्त ५ बाधितांची नोंद आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर […]

Continue Reading 0
तुम्ही बाहेर तर कोरोना घरात; पवईकरांनो घरातच थांबा

तुम्ही बाहेर तर कोरोना घरात; पवईकरांनो घरातच थांबा

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मुंबईतही प्रवेश केला आहे. या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आता शासनासह पालिकेने सुद्धा कंबर कसली आहे. यानुसारच ३ एप्रिल पर्यंत पवईतील ३ विविध परिसरांना सिल करण्यात आले आहे. जर पवईकर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येणे बंद नाही केले तर पवईतील अजूनही काही परिसर सिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यकता […]

Continue Reading 0
atm-skimming

डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले

४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप […]

Continue Reading 3

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!