@अविनाश हजारे – मुंबईतील पवई तलाव हे मुंबईकरांसाठी आकर्षणाचे ठिकाण राहिलेले आहे. या निसर्गरम्य पवई तलावाला असंख्य पर्यटक भेटी देत असतात. परंतु, पोलीस व पालिकेचा वचक नसल्याने या भागात नशेखोरांनी विळखा घातला आहे. पवई तलाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंतच्या परिसरात कायमच काळोखाचे साम्राज्य असल्याने नशेखोरांचे फावत असून, येथील विविध ठिकाणी गर्दुल्ले आणि दारुडे गट […]
Tag Archives | पवई
‘रन फॉर फौज’: अल्ट्रा-डिस्टन्स धावत पवईकराची ७१च्या युद्धातील योध्यांना मानवंदना
‘रन फॉर फौज मोहिमेच्या अंतर्गत भारताच्या लष्करी इतिहासाच्या महत्त्वाच्या घटनांच्या स्मरणार्थ पवईकर, २० वर्षीय तरुण आणि संरक्षण पत्रकार अरीत्रा बॅनर्जी यांनी सलग तीन आठवडे १० किमी, ५० किमीचे अल्ट्रामॅराथॉन, आणि मेलबर्न हाफ मॅरेथॉन (२१ किमी) धावत यावेळी लढलेल्या योध्यांना मानवंदना दिली. १६ डिसेंबर हा दिवस आपण ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो. याच दिवशी १९७१ साली […]
डिसेंबरमधील दुसरे सर्वोच्च किमान तापमान; पवईमध्ये हलक्या सरी
मुंबईमध्ये पाठीमागील आठवड्यात शुक्रवारी डिसेंबरमधील सर्वांत कमी तापमान नोंद झाल्यानंतर या आठवड्यात मुंबईचा पारा पुन्हा खाली पडला. गुरुवारी पहाटे शहराला जाग आली ती कुडकुडायला लावणाऱ्या गुलाबी थंडीने. हवामान खात्याच्या सांताक्रूझ वेधशाळेचे रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जे दशकातील दुसर्या क्रमांकाचे किमान तापमान आहे. तर गुरुवारी कुलाबा वेधशाळेत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे […]
हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’ आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण, शालेय विद्यार्थी आणि पवईकरांनी यात सहभाग नोंदवला. आपल्या सर्वांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच ताजी हवा, हिरवेगार सभोवतालचे वातावरण आणि स्वच्छ पाण्याची गरज आहे. अर्थातच पर्यावरण रक्षण ही सध्या मोठी गरज होवून बसली आहे. […]
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवईमध्ये आंदोलन, मानवी साखळी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान सहा ते सात चर्चांनंतरही सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तोडगा निघू शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पवईमध्ये सुद्धा विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. पवईतील […]
शुक्रवारी पवईमध्ये हंगामाचे सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले
मुंबईत आता गारठा वाढू लागला असून, शुक्रवारी मुंबईत आतापर्यंतचे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. सांताक्रूझ हवामान वेधशाळेत या दिवशी १९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जे सामान्यते पेक्षा कमी होते. तर दक्षिण मुंबईच्या कुलाबा हवामान स्टेशनमध्ये २२.५ अंश डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पवईमध्ये शुक्रवारी मुंबईतील सर्वात कमी म्हणजेच १८.३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. […]
व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला अटक
मुंबईतील विविध व्यापाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांसह त्यांचा मालाचीही लूट करणाऱ्या सराईत भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप अगरवाल उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू जगदीश मखिजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईतील धोबी तलाव भागात राहणारे नरेंद्र तारी यांची सावंतवाडी येथे काजूची बाग आहे. सदर बागेत येणाऱ्या काजूची विक्री करण्यासाठी त्यांचा मुलगा […]
दुकान फोडून दीड लाख किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई येथील तुंगागाव भागातील राम मोबाईल शॉप फोडून त्यातील मोबाईल, ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.४२ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. शादाब मोमीन अन्सारी (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राम प्रसाद नारायण यांचे तुंगागाव येथे राम मोबाईल शॉप नामक मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. १४ […]
बलात्कारच्या गुन्ह्यात एकाला अटक
आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत बलात्कार करणाऱ्या एका इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इसाकी हरिश्चंद्र पांडीधर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी इसाकी आणि तक्रारदार महिला हे दोघेही एकाच लॅबमध्ये काम करतात. लॅबमध्येच त्यांची ओळख […]
पवईत पुलाचा भाग कोसळला; आरेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद
पूल धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. पवईतील आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर असणारा मिठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव […]
लष्करात अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पवई पोलिसांनी केली अटक
पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले […]
बालक आश्रमात “एक घास मायेचा”
“एक घास मायेचा” उपक्रमांतर्गत ठाणे येथील बालक आश्रमातील बालकांना रविवारी पवईकर आणि चांदिवलीकर यांच्या मदतीतून मायेचा घास मिळाला आहे. मुंबईचा महाराजाधिराज व माऊली फाऊंडेशन यांच्या संयुक्त संयोजनच्या माध्यमातून “एक घास मायेचा” या अन्नदान उपक्रमा द्वारे जमा केलेले साहित्य, गहू, तांदूळ, डाळ, पोहे, सुका खाऊ, साबण, तेल, टूथपेस्ट, ताक, लस्सी, बिस्कीट, चॉकलेट्स ठाणे येऊर येथील विवेकानंद […]
पवई परिसरात ‘दिवाळी कचरा स्वच्छता अभियान’चे आयोजन
दिवाळीनंतर मुंबईच्या रस्त्यांवर फोडलेल्या फटाक्यांचा खच हा प्रत्येक वर्षी पडलेला असतो. याच समस्येला लक्षात घेत समाजसेवक आणि पवई पोलीस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पवई विभागात दिवाळी सणामध्ये फटाक्यांमुळे निर्माण झालेला कचरा साफ करत स्वच्छ प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश […]
तृतीयपंथीयांच्या सन्मानार्थ पवई धावली
@अविनाश हजारे – सर्वच समाजघटकांचा सामाजिक स्तर उंचावत असताना या प्रक्रियेत कायमच दुर्लक्षित राहिलेल्या नव्हे; ठेवल्या गेलेल्या तृतीयपंथी घटकाला समाजात सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. त्यांची समाजातील ओळख नव्याने करून देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ पवई येथे शनिवारी ‘वर्ल्ड वॉकिंग डे’चे आयोजन करण्यात आले. ‘ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल’ या […]
खून करून पसार झालेल्या दोन्ही आरोपींच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चांदिवली येथे खानावळ चालवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोकसून खून करून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. उधारीवर जेवण देण्यास नकार दिला म्हणून हा खून करण्यात आला होता. विपुल सोळंकी (२२) आणि प्रकाश सोळंकी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि अॅक्टिव्हा मोटारसायकल सुद्धा हस्तगत […]
सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत
पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]
हिरानंदानीत कुत्रीसोबत अत्याचार करणाऱ्या दुकान कामगाराला अटक
पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या गलेरिया मॉलमध्ये भटकी कुत्री नुरी हिच्यासोबत अत्याचार करून, तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंबूनाथ ओटोकांथो प्रधान (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो याच मॉलमधील एका मिठाईच्या दुकानात काम करतो. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्या भागातील डझनभर सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज […]
छातीत धारदार शस्त्राने भोकसून खून; बेवारस व्यक्तीची पटली ओळख
शनिवारी पवईतील फुलेनगर भागातील डोंगराळ भागात मिळालेल्या अनोळखी पुरुषाच्या शवाची ओळख पटली आहे. भांडूप पश्चिम येथील रमाबाई नगर येथे राहणाऱ्या प्रशांत राणे नामक व्यक्तीचे ते असल्याचे उघड झाले आहे. अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस त्याच्या खुनामागील कारण आणि आरोपी यांचा शोध घेत आहेत. फुलेनगर येथील डोंगरभागात तलावाजवळ झुडूपातून वास येत असून, एक […]
पवईत एकाचा खून; कुजलेल्या अवस्थेत सापडले शव
पवई पोलिसांच्या हद्दीत एका ३० ते ३५ वर्षीय पुरुषाचे शव शुक्रवारी बेवारस अवस्थेत मिळून आले असून, त्या तरुणाचा खून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलिसांना आयआयटी मार्केट जवळील फुलेनगर परिसरातील डोंगराळ भागात एका तरुणाचे शव […]
चैतन्यनगर घरफोड्यांच्या मास्टरमाइंडला अटक
पवई, चैतन्यनगर भागात घडणाऱ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या मास्टरमाइंडला पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अनिल उर्फ बंटी सुरेश वर्मा (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप हस्तगत केले आहेत. अजूनही काही चोऱ्यांची उकल त्याच्याकडून होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या […]