मुंबईत आता गारठा वाढू लागला असून, शुक्रवारी मुंबईत आतापर्यंतचे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. सांताक्रूझ हवामान वेधशाळेत या दिवशी १९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जे सामान्यते पेक्षा कमी होते. तर दक्षिण मुंबईच्या कुलाबा हवामान स्टेशनमध्ये २२.५ अंश डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पवईमध्ये शुक्रवारी मुंबईतील सर्वात कमी म्हणजेच १८.३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. […]


















