आपला वाढदिवस आप्तस्वकीयांसोबत सेलिब्रेट करणारे अनेक नजरेस पडतात. मात्र गरीब गरजू, बेघर आणि रस्त्यावरील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरे करणारे क्वचितच. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली एकमेकांपासून लोक लांब पळत असतानाचा पवईतील एका तरुणीने चक्क रस्त्यावरील बेघर मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. पवईतील तुंगागाव येथे राहणारी तरुणी हर्षु पवार हिचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. सर्वसामान्याप्रमाणे […]
Tag Archives | पवई
पवईत पाण्याच्या टँकरला आग
पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) धावत्या पाण्याच्या टँकरला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांच्या मदतीने दुसऱ्या एका टँकरमधील पाणी वापरून आग विझवण्यात आली. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका वॉटर सप्लाय कंपनीचा टँकर हा पाणी घेवून जेविएलआर वरून अंधेरीच्या दिशेने जात होता. मरीन इन्स्टिट्यूट […]
मराठा आरक्षणासाठी पवईत आंदोलन
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पवईसह मुंबईत विविध ठिकाणी रविवारी आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाजाने रस्त्यावर उतरत आंदोलने केली. पवईतील आयआयटी मेनगेट समोर मराठा समाजांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, जोपर्यंत स्थगिती उठविली जात […]
एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी विभास आचरेकर
@अविनाश हजारे | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस विभागाचे’ सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या बदलीनंतर बरेच दिवस रिक्त असणाऱ्या सहाय्यक आयुक्तपदी विभास आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. एस विभाग प्रशासनाच्या हद्दीत मुख्यत्वे पवई, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर आदी. परिसर येतात. पालिका ‘एफ साऊथ’ ( परेल) विभागात ते यापूर्वी कार्यरत […]
माझा बाप्पा भाग ४
पवई तलाव दिड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन – व्हिडीओ
माझा बाप्पा भाग ३
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
फोटो: अक्षय महाडिक, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व गणपती बाप्पाचे रविवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पवई तलावाच्या दोन्ही गणेश विसर्जन घाटांसह, परिसरातील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. २०२० वर्ष […]
माझा बाप्पा भाग १
चांदिवलीत स्टुडिओला आग, जीवितहानी नाही
साकीविहार रोडवर चांदिवली येथे असणाऱ्या एका स्टुडिओला आग लागल्याची घटना आज, शनिवार, १८ जुलै रोजी घडली. एसीमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सगळेच बंद असल्यामुळे सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद होते. मात्र काही दिवसांपूर्वीच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. “चांदिवली येथे असणाऱ्या या […]
पवईकराने उचलला ग्रामीण भागातील ५०० कुटुंबाच्या रेशनचा खर्च
आपली गावे, खेडी सोडून अनेक कुटुंबाना पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. मात्र इथे आल्यावर आपल्या गावाला विसरून चालत नाही. कोरोनामुळे अशी अनेक गावे आणि तेथील कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत. अशाच एका गावचे सुपुत्र पवईकर सुधाकर बाबर यांनी ही परिस्थिती लक्षात घेत गावातील सर्व रेशनधारकांचा खर्च स्वतः उचलत त्यांना आधार दिला आहे. याबद्दल […]
हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख
अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]
जेविएलआरवर सर्विस रोडला खड्डे
सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जेविएलआरवर (आदि शंकराचार्य मार्ग) नुकतेच दुरुस्तीचे काम केलेल्या सर्विस रोडला पुन्हा खड्डे पडले आहेत. ट्रिनीटी चर्च ते गांधीनगर उड्डाण पूल भागात हे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिक जॉली मोरे यांनी यासंदर्भात पालिकेला तक्रार केली होती. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. या मार्गावरून […]
पवई तलाव भरला रे !
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने सुटला लोकांच्या जेवणाचा प्रश्न
@आकाश शेलार कोरोना वैश्विक महामारीमध्ये अनेक गरीब गरजूंना हाताला काम नाही त्यामुळे त्यांच्यासमोर परिवाराच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला असताना विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने या प्रश्नाला उत्तर शोधण्यात आले आहे. यांच्यावतीने परिसरातील लोकांना ९२ दिवस मोफत अन्नदान करण्यात आले. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना हातावर पोट […]
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एस विभाग प्रयत्नशील
नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग) अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर […]
चैतन्यनगरचे भाजी मार्केट ५ दिवस बंद, व्यापारी संघटनेची घोषणा
पवई आयआयटी मार्केट येथे असणारे चैतन्यनगर भाजी मार्केट २६ जून ते ३० जून २०२० या कालावधीत बंद राहणार आहे. व्यापारी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत परिसरात बोर्ड लावून व्यापारी संघटनेने सूचित केले आहे. पालिका ‘एस’ विभागात कोरोना बाधितांची संख्या ही दुपटीने वाढू लागली आहे. यामुळेच पवई वगळता अनेक भागात पालिका एस विभागातर्फे पुन्हा […]
गांधीनगरजवळ भरधाव कार पलटली, दोन जण जखमी
पवईकडून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी भरधाव मोटार कार गांधीनगर पुलाजवळ पलटली. बुधवार, २४ जूनला संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह एक महिला सुद्धा जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०३ बीएस ८४२८ डस्टर कार जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) मुलुंडच्या दिशेने चालली होती. “भरधाव वेगात जाणारी ही कार […]
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पवईत सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण
कोरोना व्हायरसच्या उद्रेक दरम्यान पवईतील विविध भागात सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने शनिवारी पवईत ही फवारणी करण्यात आली. शनिवारी एकाच दिवसात देशात १४,५१६ नवीन कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली. ज्यामुळे शनिवारी बाधितांची संख्या ३,९५,०४८ वर पोहचली होती. ज्यापैकी २.१ लाख रूग्ण बरे झाले आहेत. […]
पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला
पालिका एस विभागांतर्गत येणाऱ्या पवई परिसरात कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला असून, सोमवार २२ जून रोजी पवईमध्ये ३ बाधितांची नोंद झाली आहे. पवई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत मिळालेल्या बाधितांचा आकडा पाहता पवई परिसरात बाधित मिळण्याचा वेग मंदावला असल्याचे समोर येत आहे. कोरोना विषाणूंनी मुंबईवर आपली पकड घट्ट केली असून, पालिका ‘एस’ विभाग कोविड-१९च्या यादीत […]