Tag Archives | पवई

IMG_4922 copy

दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

फोटो: अक्षय महाडिक, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व गणपती बाप्पाचे रविवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पवई तलावाच्या दोन्ही गणेश विसर्जन घाटांसह, परिसरातील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. २०२० वर्ष […]

Continue Reading 0
studio-in-chandivali-caught-fire-no-casualties

चांदिवलीत स्टुडिओला आग, जीवितहानी नाही

साकीविहार रोडवर चांदिवली येथे असणाऱ्या एका स्टुडिओला आग लागल्याची घटना आज, शनिवार, १८ जुलै रोजी घडली. एसीमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सगळेच बंद असल्यामुळे सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद होते. मात्र काही दिवसांपूर्वीच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. “चांदिवली येथे असणाऱ्या या […]

Continue Reading 0
babar_sudhakar_ration_distribution

पवईकराने उचलला ग्रामीण भागातील ५०० कुटुंबाच्या रेशनचा खर्च

आपली गावे, खेडी सोडून अनेक कुटुंबाना पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. मात्र इथे आल्यावर आपल्या गावाला विसरून चालत नाही. कोरोनामुळे अशी अनेक गावे आणि तेथील कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत. अशाच एका गावचे सुपुत्र पवईकर सुधाकर बाबर यांनी ही परिस्थिती लक्षात घेत गावातील सर्व रेशनधारकांचा खर्च स्वतः उचलत त्यांना आधार दिला आहे. याबद्दल […]

Continue Reading 0
online cheating

हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख

अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]

Continue Reading 0
JVLR khadde

जेविएलआरवर सर्विस रोडला खड्डे

सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जेविएलआरवर (आदि शंकराचार्य मार्ग) नुकतेच दुरुस्तीचे काम केलेल्या सर्विस रोडला पुन्हा खड्डे पडले आहेत. ट्रिनीटी चर्च ते गांधीनगर उड्डाण पूल भागात हे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिक जॉली मोरे यांनी यासंदर्भात पालिकेला तक्रार केली होती. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. या मार्गावरून […]

Continue Reading 0
powai lake overflow

पवई तलाव भरला रे !

  आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

Continue Reading 0
Vishwa Hindu Parishad and Rohit Rai Mitra Mandal solved the poor people’s food problem

विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने सुटला लोकांच्या जेवणाचा प्रश्न

@आकाश शेलार कोरोना वैश्विक महामारीमध्ये अनेक गरीब गरजूंना हाताला काम नाही त्यामुळे त्यांच्यासमोर परिवाराच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला असताना विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने या प्रश्नाला उत्तर शोधण्यात आले आहे. यांच्यावतीने परिसरातील लोकांना ९२ दिवस मोफत अन्नदान करण्यात आले. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना हातावर पोट […]

Continue Reading 0
vilas mohkar

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एस विभाग प्रयत्नशील

नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग) अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर […]

Continue Reading 0
chaitanya nagar vegitable market closed

चैतन्यनगरचे भाजी मार्केट ५ दिवस बंद, व्यापारी संघटनेची घोषणा

पवई आयआयटी मार्केट येथे असणारे चैतन्यनगर भाजी मार्केट २६ जून ते ३० जून २०२० या कालावधीत बंद राहणार आहे. व्यापारी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत परिसरात बोर्ड लावून व्यापारी संघटनेने सूचित केले आहे. पालिका ‘एस’ विभागात कोरोना बाधितांची संख्या ही दुपटीने वाढू लागली आहे. यामुळेच पवई वगळता अनेक भागात पालिका एस विभागातर्फे पुन्हा […]

Continue Reading 0
भरधाव कार पलटली

गांधीनगरजवळ भरधाव कार पलटली, दोन जण जखमी

पवईकडून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी भरधाव मोटार कार गांधीनगर पुलाजवळ पलटली. बुधवार, २४ जूनला संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह एक महिला सुद्धा जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०३ बीएस ८४२८ डस्टर कार जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) मुलुंडच्या दिशेने चालली होती. “भरधाव वेगात जाणारी ही कार […]

Continue Reading 0
Sanitisation with help of Sanitisation tractor

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पवईत सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण

कोरोना व्हायरसच्या उद्रेक दरम्यान पवईतील विविध भागात सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने शनिवारी पवईत ही फवारणी करण्यात आली. शनिवारी एकाच दिवसात देशात १४,५१६ नवीन कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली. ज्यामुळे शनिवारी बाधितांची संख्या ३,९५,०४८ वर पोहचली होती. ज्यापैकी २.१ लाख रूग्ण बरे झाले आहेत. […]

Continue Reading 0
go corona

पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला

पालिका एस विभागांतर्गत येणाऱ्या पवई परिसरात कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला असून, सोमवार २२ जून रोजी पवईमध्ये ३ बाधितांची नोंद झाली आहे. पवई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत मिळालेल्या बाधितांचा आकडा पाहता पवई परिसरात बाधित मिळण्याचा वेग मंदावला असल्याचे समोर येत आहे. कोरोना विषाणूंनी मुंबईवर आपली पकड घट्ट केली असून, पालिका ‘एस’ विभाग कोविड-१९च्या यादीत […]

Continue Reading 1
Coronavirus Photo Credit सांकेतिक चित्र

पालिका ‘एस’ विभाग कोविड -१९च्या यादीत पहिल्या दहात

भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवईचा काही भाग यांचा समावेश असलेला पालिका ‘एस’ विभाग अल्प कालावधीतच कोविड -१९ यादीत खालच्या स्थानावरून अव्वल दहामध्ये पोहचला आहे. पूर्व उपनगरातील या विभागात एकट्या गेल्या आठवड्यातच ६०० हून अधिक रुग्ण आढळले असून, मुंबईत हे आठव्या क्रमांकावर आहे. बहुतेक बाधित हे भांडूप, विक्रोळी येथील झोपडपट्टी सदृश्य भागातील असून, अपमार्केट असणाऱ्या पवईचा […]

Continue Reading 0
sewer-cleaning-in-hiranandani-powai

हिरानंदानीत नालेसफाईच्या कामांना वेग

जून महिना अर्ध्यावर पोहचला असून, पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावत आपल्या आगमनांचे संकेत दिले आहेत. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत अडकून पडलेल्या पालिका प्रशासनाला यावर्षी नालेसफाईला वेळेच्या नियोजनासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र आता पालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. पवईतील हिरानंदानी भागात सुद्धा नालेसफाई सुरु असल्याची चित्रे लोकांना दिसू लागली आहेत. मार्च […]

Continue Reading 0

ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी

‘अनलॉक १’ मध्ये काही दुकाने आणि व्यवसाय चालू झाली असली तरीही काही दुकानांना उघडण्यास अद्याप  बंदी करण्यात आली आहे. या काळात एका बँक कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स दिल्यामुळे खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवत त्याला टोपी घातली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच दारु ऑनलाईन विक्रीला […]

Continue Reading 1
shalmali with father

शाल्मली खोलगडे यांनी वडिलांना वाढदिवशी दिले अनोखे सरप्राईज

गायक आणि पॉपस्टार शाल्मली खोलगडे यांनी त्यांच्या वडिलांच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देत त्यांना एक गोड भेट दिली. त्यांनी आपल्या वडिलांना आणि आईला आश्चर्यचकित करत दिलेल्या या भन्नाट भेटीचे चित्रीकरण आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये शाल्मली खोलगडे म्हणतात “आज बाबांचा वाढदिवस आहे आणि मी त्याच्यासाठी खास त्यांच्या आवडीचा ‘आलू पराठा’ बनवित आहे आणि मी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!