सीमाशुल्क विभागाच्या एका इन्स्पेक्टर आणि त्यांच्या पत्नीला एका तोतयाने तिचा भाऊ असल्याचे सांगत १.९ लाखाला गंडवले आहे. तत्काळ पैशांची गरज असलेल्या आपल्या मित्राच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत या तोतयाने त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात पवई पोलीस गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पवई पोलिसांनी सांगितले की, सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या पत्नीने […]
Tag Archives | पवई
पवईत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; एकाला अटक
पूर्व वैमनस्याचा राग मनात ठेवून भांडण काढत एका तरुणावर ४ लोकांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. इसाकीमुत्तू तेवर कटेन असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३४ (दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाने केलेल कृत्य) नुसार गुन्हा नोंद करत मुत्तू […]
महागड्या सायकल चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई आणि आसपासच्या परिसरातून महागड्या सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवई पोलिसांनी त्याच्याकडून ११ मे रोजी चोरी केलेली एक महागडी सायकल सुद्धा हस्तगत केली आहे. अश्विन ईश्वरलाल मोहिते (१९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनाकीया रेंनफॉरेस्ट सोसायटी, येथे राहणारे ४३ वर्षीय फिर्यादी […]
दिपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आदिवाशी पाड्यांमध्ये अन्नधान्य वाटप
गरीब गरजू मुलांच्या शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पवईतील दिपस्तंभ प्रतिष्ठानच्यातर्फे रविवारी येथील आदिवासी पाड्यांमध्ये अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी आणि पवई पोलिसांतर्फे या किटचे वाटप आदिवासी पाड्यातील बांधवाना करण्यात आले. कोरोनाला थोपवण्यासाठी करण्यात आलेल्या लाकडाऊनमुळे सर्वांनाच घरी बसण्याची वेळ आली आहे. अशात बेरोजगारी आणि कामाच्या कमीमुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. […]
पवई तलाव आणि परिसराची दुर्दशा; पालिकेचे देखभालीकडे दुर्लक्ष
मुंबईमधील पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या पवई तलावाची दुर्दशा होत चालली आहे. पवई तलावात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दुषित होवून तलावात जलपर्णी निर्माण झाल्या आहेत. सोबतच तलावाच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरण दुर्लक्षित झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालिका आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पवई तलावाला हे दिवस भोगावे लागले आहेत. तलावाच्या सुशोभिकरण आणि साफसफाईसाठी पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले […]
एक पाऊल माणुसकीच्या दिशेने; मुंबई कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिरात १९७ जणांनी केले रक्तदान
मुंबई कॉंग्रेस विक्रोळी विभागातर्फे २० मे रोजी पवई इंग्लिश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोव्हीड – १९ संक्रमणांच्या वाढत्या संख्येविरूद्ध लढा देण्यासाठी मदत करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्यकारी अध्यक्ष चरणसिंह सप्रा, मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष […]
पवईत २०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
@रविराज शिंदे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मुंबईसह महाराष्ट्रात रक्ताचा तुडवडा भासत असल्याने प्रशासनाची होणारी दमछाक याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने रक्तदानासाठी आव्हान केले होते. या आव्हानाला साद देत पवईकर रक्तदानासाठी पुढे सरसावले असून, रविवारी २०५ पवईकर रक्तदात्यांनी रक्तदान केले. पवई प्रभाग क्रमांक १२२मधील युवासेना तर्फे पवई इग्लिंश हायस्कूल पटांगणात हे रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी लॉकडाऊनचे […]
पवईच्या रस्त्यांवर मुंबई दर्शन आणि शिवकालीन इतिहास
@ सुषमा चव्हाण कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. १५ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढून आता ३१ मे पर्यंत झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना वगळता इतर नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा नाहीये. मे महिना म्हणजे शालेय सुट्ट्या आणि नागरिकांच्या पर्यटनाचे दिवस मात्र, या लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडता येत नसल्याने हे शक्य […]
मेट्रो ६ प्रकल्प: पवईतील दोन पादचारी पूल हटवण्यास सुरुवात
प्रमोद चव्हाण, गौरव शर्मा स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (पूर्व धृतगती मार्ग) या मार्गावर सुरु असणाऱ्या मेट्रो ६च्या मार्गात येणाऱ्या पवईतील २ पादचारी पुलांना हटवण्याची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये आयआयटी मार्केट गेट समोरील पादचारी पूल आणि मिलिंदनगर येथील पादचारी पुलाचा समावेश आहे. जेवीएलआर मार्गाच्या निर्मितीवेळी भविष्यात येथून जाणाऱ्या वाहनांच्या संख्या आणि रस्ता क्रॉसिंगला येणाऱ्या अडचणी […]
पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद
मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच पवई आणि चांदिवलीत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवार, २३ मार्चला एकाच दिवसात पवई आणि चांदिवली परिसरात मिळून ४९ नव्या बाधितांची नोंद पालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभरातील या परिसरातील कोरोना बाधितांची ही सर्वांत मोठी वाढ आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांमध्ये इमारत भागात राहणाऱ्या रहिवाशांची […]
मित्रांसोबत पार्टी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्याने केली फसवणूक; पुण्यातून अटक
पवईकराच्या लोणावळ्यातील एका व्हिलाच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट जाहिरात आणि आयडी तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला पवई पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. बांद्रा येथे निर्माण करण्यात आलेल्या सायबर युनिटच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आकाश जाधवानी असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. व्हिला बुकिंगसाठी मोठी सूट देत डझनभरापेक्षा जास्त पर्यटकांना […]
पवईत मंगळवारी १२ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित; मुंबईत काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
पवईतील अँकर ब्लॉक येथे तानसा पूर्व सागरी ९०० मी.मी. व्यासाच्या झडपाच्या दुरुस्ती आणि पवई उच्चस्तरीय जलाशय-१च्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. मंगळवार, २३ मार्चला या कामामुळे पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवईतील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व, धारावी, वांद्रे भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पालिका जल […]
१.६ किलो गांजासह पवईत एकाला अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
रामबाग उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडकून अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू
पवई, रामबाग उड्डाणपुलाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री पवईत घडली. २० वर्षीय तरुण विक्रोळीच्या दिशेने जात असताना डिव्हायडरला (दुभाजक) धडकून हा अपघात झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे. स्वप्नील सुभाष अहिवले (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रपाळी कर्तव्यावर असणाऱ्या पवई […]
‘शासन तुमच्या दारी’: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरानंदानीत जन बैठकीचे आयोजन
‘शासन तुमच्या दारी’ संकल्पने अंतर्गत हिरानंदानी भागात रविवार, ३ मार्चला जन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग); महेश्वर रेड्डी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०); रमेश नांगरे, सहाय्यक आयुक्त (साकीनाका विभाग); आबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे); पोलीस निरीक्षक दिलीप धामुनसे (गुन्हे); आमदार दिलीप (मामा) लांडे, हिरानंदानी […]
कोरोना प्रसार रोखण्यासाठी पवई, भांडूपमधील सोसायटींवर कडक निर्बंध; स्विमिंग पूल जिम बंद
मुंबईत कोरोना व्हायरसमुळे पुन्हा वाढती बाधितांची संख्या हे चिंतेचे कारण बनले आहे. गेल्या काही दिवसांत महानगरपालिका ‘एस’ प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. जे पाहता पालिका एस विभागाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपाययोजना म्हणून प्रभागातर्फे कडक निर्देश देण्यात आले आहेत. गर्दी करणे टाळणे, स्विमिंग पूल, जीम बंद ठेवणे […]
पवई खून प्रकरण: दोन आरोपींना हत्यारासह पवईतून अटक; गुन्हे शाखेची कारवाई
पवई येथील ४० वर्षीय राजेश भारद्वाज याचा खून करून पसार झालेल्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल फोन, सीम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले आहे. नूर युनुस खान (वय २२ वर्ष) आणि सलीम आरिफ खान (वय २१ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. […]
साकीनाका येथे गोडाऊन फोडून १८ लाखाची चोरी करणाऱ्या चोरट्यांना ३ तासात अटक
साकीनाका येथील अरिहंत इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या एमएमपीएम या कंपनीची भिंत तोडून लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरुन नेणाऱ्या ३ आरोपींना साकीनाका पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. इमरान मेहरान शेख (१९) आणि अक्षय शर्मा (२४) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांचा अजून एक साथीदार दिनेश दुमडिया मात्र फरार आहे. साकीनाका पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत […]
करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली महिलेला ५ लाखाचा गंडा
ऑस्ट्रेलिया येथील क्रुज जहाजावर सुरक्षा अधिकारी असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला चलन विनिमयच्या (करन्सी एक्स्चेंज) नावाखाली २ महिलांनी ५ लाखाचा गंडा घातला आहे. मरीना गोन्साल्वीस असे फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात तिने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एक ६० वर्षीय महिला आणि तिची विशीतील महिला साथीदार यांनी मिळून मरीनाची फसवणूक केली […]
पवईत व्यावसायिकाचा गळा चिरून खून
पवई तलावाजवळ एका ४० वर्षीय फळ-भाजी विक्रेत्याचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. त्याच्या अंगावर वार आणि जखमांच्या खुणा आहेत. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चांदशहावाली दर्गाच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याचही माहिती प्राप्त झाली होती. […]