@रविराज शिंदे | पवईतील जवळपास १० हजार लोकवस्तीचा दाटीवाटीचा परिसर असणाऱ्या आयआयटी पवई येथील महात्मा फुले नगरात शनिवारी, २ मे रोजी येथील स्थानिक रहिवाशांच्या तपासणीसाठी फिव्हर क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका एस विभाग आणि स्थानिक नगरसेविका जागृती पाटील यांच्या माध्यमातून या फिव्हर क्लिनिक चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात रहिवाशांनी याचा […]
Tag Archives | फुलेनगर
पवईचे स्वच्छता दूत: तरूणांनी हातात झाडू घेत केली शौचालयाची स्वच्छता; बसवले सीसीटिव्ही
@रविराज शिंदे पवईतील महात्मा फूले नगरातील शौचालयाची दयनीय अवस्था झाल्याचे पालिका ‘एस’ विभागाला वेळोवेळी कळवूनसुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक तरुणांनी हातात झाडू घेत या शौचालयाची स्वच्छता केली. यामुळे त्रस्त रहिवाशांना दिलासा मिळाला असून, टाळाटाळ करणाऱ्या पालिकेला आणि जनप्रतिनिधींना सणसणीत चपराक मारली आहे. पवईतील आयआयटी भागाला लागून असणारा फूलेनगर परिसर हा असंख्य झोपड्या […]
पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी
@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]
फुलेनगरमध्ये शौचालय दुरुस्तीत दिरंगाई; तरुणास सर्पदंश
@अविनाश हजारे पवईच्या राष्ट्रपिता महात्मा फुलेनगर वसाहतीमधील मुख्य शौचालय बांधणीस मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या विभागातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वैभव भगत असे या तरुणाचे नाव असून, परिसरात शौचालय उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या अन्य एका मित्रासोबत तो बाजूच्या जंगलात शौचास गेला असताना विषारी सापाने त्याला दंश केल्याची […]
फुलेनगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाचा शुभारंभ
@रविराज शिंदे महात्मा फुलेनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नवरंग क्रीडा मंडळाच्या पाठपुराव्यामुळे अखेर याला चालना मिळाली असून, स्थानिक आमदार अशोक पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून गेल्या आठवड्यात पुतळा परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला. येथील स्थानिक व रिपाइं मुंबई संघटक दिलीप हजारे यांच्या हस्ते १९९३ साली डॉ बाबासाहेब […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त पवईत विविध कार्यक्रमांचे आयोजन
रविराज शिंदे, अविनाश हजारे, सुषमा चव्हाण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त १४ एप्रिल २०१६ रोजी दिवसभर पवईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण दिवस हा विविध माध्यमातून ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ‘धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन’ तर्फे बाईक […]
फुलेनगरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक
एक रुपया देण्याचे आमिष दाखवून, पवईमधील फुलेनगर भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय क्रूरकर्म्याने, आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी क्रूरकर्म करणारा अशोक चाळके यास पवई पोलिसांनी अटक केली असून, वैद्यकीय तपासणी करून उद्या न्यायालयात सादर केले जाणार आहे. पिडीत मुलगी ही आपल्या आई वडिलांसह आयआयटी येथील […]
विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती
आयआयटी | रविराज शिंदे ऊन पावसाच्या चाललेल्या पाठ शिवणीच्या खेळामुळे मुंबईत डेंगू, मलेरिया, स्वाईन-फ्लू सारख्या विविध आजारांनी तोंड वर काढले आहे. या आजारांना पालिकेकडून आधीच धोकादायक आजार म्हणून घोषित करण्यात आले असून, या आजारांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु त्यानंतरही अनेक लोकांपर्यंत माहिती पोहचत नसल्याने, अनेक लोक आजही या आजारांचे बळी पडत […]