प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला […]
Tag Archives | लॉकडाऊन
ऑनलाईन नोकरीच्या शोधात असणाऱ्या पवईतील तरुणीला गंडा
लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामे बंद आहेत. अशात बाहेर पडणे शक्य नसल्याने घरातच बसून काम करण्यासाठी ऑनलाईन नोकरी शोधत असणाऱ्या तरुणीला सायबर ठगांनी फसवल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अंमलात आणलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मुंबईकरांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला […]
विनाकारण फिरणे पवईकरांना पडले महागात; मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांनी आपल्या दांड्याने प्रसाद दिला आहे. मात्र त्यानंतरही अनेक तरुण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने याबाबत पवई पोलिसांनी ठोस पाऊले उचलत विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांवर १८८ नुसार गुन्हे नोंद करून वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त […]
सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान
संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असून, आवश्यकता नसताना कोणालाही घरातून बाहेर निघण्याची अनुमती नसताना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेल्या ७ फुट लांब ७२ किलो वजनाच्या मगरीला पॉज मुंबई च्या प्राणीमित्रांनी तिला पकडून जीवनदान दिले आहे. नंतर तिला नैसर्गिक वास्तव्यात सोडून देण्यात आले आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिनीखाली ही मगर आढळून आली होती. पूर्ण मुंबई शहर लॉकडाऊनमध्ये असताना […]