Tag Archives | विद्यार्थी

phishing

आयआयटीच्या विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे पडले महागात, सायबर चोरांचा २७ हजाराचा चुना

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले आहे. खराब डिलीव्हर झालेल्या पिझ्झाच्या भरपाई रकमेला मिळवण्याच्या नादात सायबर चोरांच्या जाळ्यात अडकून तिला आपल्याच खात्यातील २७ हजार रुपये गमवावे लागले आहेत. पवई पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या सीचा वाजपेयी हिने ऑनलाईन फूड […]

Continue Reading 0
cattle in iit bombay

आयआयटी पवईच्या क्लासरूममध्ये भटक्या गाईचा फेरफटका

आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बैलांच्या जोडीने धावपळ करताना एका इंटर्नला जखमी केल्याची घटना अजून ताजी असतानाच, येथील एका क्लासरूममध्ये भटकी गाई घुसल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. भटकी जनावरे येथील विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असतानाच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात प्रशासन गुंतले असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. एका क्लासरूममध्ये लेक्चर सुरु असताना एक गाय त्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवई पोलिसांनी पकडला ३७ किलो गांजा; दोघांना अटक

पवई परिसरात मोठ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेल्या ५.५ लाखाच्या गांजासह पवई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अनिकेत अमर पवार (२४), सुरेश झोकु गुप्ता (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम ८ (क) सह २० एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पवई पोलिसांनी […]

Continue Reading 1
iit powai

मुंबई आयआयटीतील विद्यार्थीनीना विषबाधा

मुंबई आयआयटीमधील मुलींच्या हॉस्टेल क्रमांक १० मधील विद्यार्थीनीना गोड खाण्यातून विषबाधा झाल्याचे सोमवारी समोर आले आहे. ही विषबाधा शनिवारी झाल्याचे समोर येत असून, सुरुवातीला नाकारणाऱ्या आयआयटी प्रशासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा मान्य केले. विषबाधेमुळे २५ विद्यार्थीनीना आयआयटीच्या अंतर्गत रुग्णालयात दाखल करून, उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत काही […]

Continue Reading 0
job offers

आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये कोट्यावधीच्या पॅकेजेसचे जॉब ऑफर्स

भरमसाठ पगाराच्या पॅकेजेससाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये १ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत हा टप्पा पार पडला. नेहमीप्रमाणे आयआयटीयन्सला मिळणारे कोट्यवधीचे पॅकेजेस या वेळीही पहायला मिळाले. पहिल्या टप्प्यात प्लेसमेंट प्रक्रियेत निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या टप्यात अकराशे […]

Continue Reading 0
IIT Students protest

आयआयटी मुंबईच्या पीएचडी विद्यार्थ्यांचे कॅम्पस गेटबाहेर आंदोलन

विद्यार्थी कॅम्पस बाहेर आंदोलन करताना रविराज शिंदे आयआय मुंबईतील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने शुक्रवारी (२१ डिसेंबर) प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे आयआयटीत निषेध रँली सुद्धा काढण्यात आली. यावेळी विविध विषयांवर पीएचडी करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख मागण्यासहित अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी […]

Continue Reading 0
intro

दहावी परीक्षेत पवईच्या विद्यार्थ्यांची भरारी

@प्रमोद चव्हाण पवईतील अनेक विद्यार्थी शैक्षणिक करिअरच्या स्तरावर पदार्पण करत आहेत. मार्चमध्ये झालेल्या एसएससी (दहावी) परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात बऱ्याच विद्यार्थ्यांनी ९७% पेक्षा अधिक गुण मिळवून त्यांचे कुटुंब आणि शाळा दोघांना गौरव मिळवून दिला आहे. आम्ही पवईंच्या शाळांमधील समृद्ध मिश्रणाचा थोडक्यात घेतलेला आढावा. एस एम शेट्टी हायस्कूल व कनिष्ठ […]

Continue Reading 0

पवईतील विद्यार्थ्यांची ‘प्लास्टिक फ्री पवई’ची मोहीम

पवईला प्लास्टिक फ्री करण्यासाठी पवईतील हिरानंदानीमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, परिसरात ‘प्लास्टिक फ्री पवई’ मोहीम राबवत आहेत. लोकांनी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी ते परिसरात गेल्या महिनाभरापासून जनजागृती करत आहेत. मुंबईतील हिरानंदानी फाऊन्डेशन स्कूल, ओबेरॉय स्कूल, इकोलेमोन्डेले स्कूल, एस. एम. शेट्टी स्कूल अशा नामांकित शाळांमध्ये शिकणाऱ्या श्लोक बाबू, […]

Continue Reading 0
crime1

पवई अनैसर्गिक लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपींना पाहणारा साक्षीदार मिळाला

पवईतील गौतमनगर येथे शालेय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना ओळखणारा एक साक्षीदार पवई पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या साक्षीच्या आधारावर पवई पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. वाचलेल्या मुलाचे यकृत निकामी झाले असून, डॉक्टरांनी त्याला प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. गेल्या आठवड्यात गौतमनगर येथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला दवाखान्यात दाखल […]

Continue Reading 0
crime1

दोन शाळकरी मुलांवर लैंगिक अत्याचार, मुलांनी घेतले विष; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

पवईतील फिल्टरपाडा येथील जयभिमनगरमध्ये राहणाऱ्या दोन शाळकरी मुलांवर सामुहिक लैंगिक अत्याचार झाल्यानंतर, पिडीत मुलांनी विष घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी अनैसर्गिक संबंध आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी इसमांचा शोध सुरु केला आहे. ८ जुलै रोजी संध्याकाळी शाहीद (११) व सुनील (१३) (दोन्ही बदलेली नावे) ट्युशनला जात असताना परिसरातील […]

Continue Reading 0
fob-iit-main-gate

पादचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थिनीने रंगवले पादचारी पूल

पादचारी पूल असून ही जीवावर उदार होत वाहतुकीतून रस्ता काढत जाणाऱ्या मुंबईकरांना पादचारी पुलाकडे आकर्षित करण्यासाठी, आयआयटी पवईत शिकणाऱ्या सलोनी मेहता या विद्यार्थिनीने सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १५ तास खर्ची घालून आयआयटी मेन गेट समोरील पादचारी पूल व परिसराची साफसफाई करून पायऱ्या व भिंती चित्रे काढून आणि रंगवून लोकांना या पादचारी पुलाचा वापर करण्यासाठी आकर्षित केले […]

Continue Reading 0
suicide

परीक्षेच्या तणावाखाली विद्यार्थिनीची ‘निटी’मध्ये आत्महत्या

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (निटी) मध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने, कॅपसमधील ‘गिल्बर्ट हॉल’ इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. सुरभी शिवकुमार शर्मा असे विद्यार्थिनीचे नाव असून, परीक्षेच्या मानसिक तणावाखाली तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मूळची चैन्नई येथील रहिवाशी असलेली सुरभी निटीमध्ये औद्योगिक अभियांत्रिकीचे पदव्युत्तर पदवीकेचे शिक्षण घेत होती. तिचा मोठा […]

Continue Reading 0
संग्रहित छायाचित्र:

आयआयटीत पाण्याच्या वापराची चंगळ

आयआयटी विद्यार्थ्यांनी पाहणी व अभ्यास करून ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून वास्तव आणले समोर एकीकडे मुंबईकर पाणी टंचाईशी लढत असतानाच, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) मुंबईतील पवई कॅम्पसमध्ये मात्र पाण्याची चंगळ चालू असल्याची खळबळजनक माहिती आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास पाहणीतून समोर आली आहे. मुंबईकरांना सरासरी २६८ लिटर पाणी दररोज वापरास […]

Continue Reading 0
sandesh vidyalay

विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती

आयआयटी |  रविराज शिंदे ऊन पावसाच्या चाललेल्या पाठ शिवणीच्या खेळामुळे मुंबईत डेंगू, मलेरिया, स्वाईन-फ्लू सारख्या विविध आजारांनी तोंड वर काढले आहे. या आजारांना पालिकेकडून आधीच धोकादायक आजार म्हणून घोषित करण्यात आले असून, या आजारांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु त्यानंतरही अनेक लोकांपर्यंत माहिती पोहचत नसल्याने, अनेक लोक आजही या आजारांचे बळी पडत […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!