साकीविहार रोडवरील तुंगागाव आणि मुरंजनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित मिळत असल्याने वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने हा परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमवार ८ जून २०२० पासून ते २१ जून २०२० पर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात व्यवहार आणि संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना विषाणूमुळे […]
Tag Archives | साकीविहार रोड
वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत […]
सार्वजनिक ठिकाणी तरुणीशी जबरदस्ती करणाऱ्या आरोपीला अटक
तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन करत जबरदस्तीने तिचे चुंबन घेणाऱ्या २५ वर्षीय रोमिओला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत अटक केली आहे. वसीम शेख असे या तरुणाचे नाव असून, पिडीत तरुणी आणि आरोपी दोघेही पवईतील एकाच परिसरात राहतात. रविवारी पिडीत घरी परतत असताना हा प्रकार घडला होता. त्यानंतर पीडितेने ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबियांनी […]
पवई, चांदिवली पाच तास थांबली
प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे, रमेश कांबळे “मुंबापुरी आणि मुंबईकर कितीही संकटे आली तरी कधीच थांबत नाहीत” असे म्हटले जाते. मात्र, मुंबईचा भाग असणारे पवई आणि चांदिवली आज जवळपास ५ तास वाहतूक कोंडीत थांबली. पवई आणि चांदिवली भागात सकाळी ९ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास पाच तास शाळेच्या […]
पवई ते साकीनाका मेट्रो एसी बस सेवा सुरु
पवईमध्ये कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी व पवईमधून इतर भागात कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी सिटीफ्लो तर्फे साकीनाका मेट्रो स्थानक ते पवई अशी नवीन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. साकीविहार रोड, चांदिवली मार्गे हिरानंदानीपर्यंत ही सेवा असणार आहे. या भागात कामासाठी येणाऱ्या लोकांना रिक्षावाल्यांचे भाडे नाकारणे, तासनतास वाहनांची वाट बघत बसणे व प्रवाशांची बस मधील गर्दी यातून […]
रहेजा विहारचा पर्यायी मार्ग अखेर खुला
गेली अनेक वर्ष पर्यायी मार्गासाठी लढणाऱ्या रहेजाकरांना त्यांचा हक्काचा पर्यायी मार्ग अखेर खुला झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते रहेजा विहार ते साकीविहार रोड हा पर्यायी मार्ग रहेजाकरांसाठी खुला करण्यात आला आहे. कुर्ला तालुका अध्यक्ष शरद पवार, स्थानिक नगरसेविका सविता पवार, महानगरपालिका अधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी […]