प्रमोद चव्हाण
प्रमोद चव्हाण
मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे हवेत बराच गारवा निर्माण झाला होता. पवई भागात वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ईडन इमारत परिसरात उभे असणारे एक झाड उन्मळून पडले. लागूनच असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर हे झाड पडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही. पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचा डोंगर […]
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी […]
पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली […]
परिवर्तनवादी विचारवंत मा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयआयटी, पवई येथे धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पवईतील तिरंदाज महानगरपालिका शाळेत ‘प्रबोधनकार ठाकरे आणि परिवर्तनवादी विचार’ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. पवईतील जनतेसाठी शैक्षणिक […]
चांदिवली गावाची मानाची हंडी – श्री साई गणेश मित्र मंडळ यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौक, संघर्ष नगर येथे हंडीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार पूनम महाजन यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
चालत्या बसमधून लोकांचे मोबाईल फोन, पाकीट चोरून पसार होणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव इजाज शेख (३८) असे असून, तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पवई पोलिसांनी दोन महागडे मोबाईल फोन हस्तगत करून त्याला तुरुंगाची हवा दाखवत असे गुन्हे करणारांना एक जरब बसवलेली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीमुळे पूर्व […]
गेली अनेक वर्ष पर्यायी मार्गासाठी लढणाऱ्या रहेजाकरांना त्यांचा हक्काचा पर्यायी मार्ग अखेर खुला झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते रहेजा विहार ते साकीविहार रोड हा पर्यायी मार्ग रहेजाकरांसाठी खुला करण्यात आला आहे. कुर्ला तालुका अध्यक्ष शरद पवार, स्थानिक नगरसेविका सविता पवार, महानगरपालिका अधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी […]
माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना […]
शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर […]
पवई लेक होम, फेज तीन मधील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, एका महिलेसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मृतांपैकी तीन जणांचा मृत्यू हा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून झाला आहे. एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले […]
सुषमा चव्हाण | sush0705@gmail.com लोकांचा मित्र, गुरु, मास्टर छायाचित्रकार, भाऊ, एक उत्तम मार्गदर्शक, छाया-पत्रकार, कलाकार अशी विविध विशेषणांनी ज्यांना संबोधले जाते, असे विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश त्रिवेदी उर्फ मुकी आणि सगळ्या पवईकरांचे लाडके दादा. लहानपणी शाळेत असताना चित्रकलेची आवड असणारा बाल-चित्रकार ते प्रख्यात छायाचित्रकार असा प्रवास करताना कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून सुद्धा लोकांच्या मनात घर करून राहिलेला हा पवईचा अवलिया. एकेकाळी जंगल, डोंगराळ, खाणीचा […]
विमानतळ परिसरात दिसलेले पॅराशूट हे कदाचित घातपाताच्या उद्देशाने तिथे आले होते, परंतु ते त्यात सफल होऊ शकले नाहीत आणि ते थेट पवईच्या दिशेने आले आहेत. अशी बातमी पवई परिसरात फिरत असतानाच, सोमवारी दिवसभर विविध तपास यंत्रणांनी पवई भागात राबवलेल्या तपास मोहिमेने पवईकरांची चांगलीच पाचावर धारण बसली. परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु मंगळवारी […]
साकिनाका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी आणि पोलिस शिपाई योगेश पोंडे सह एकूण आठ जणांना मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी गुन्हे शाखेने एका मॉडेलवर बलात्कार आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र ह्या प्रकरणात स्थानिकांचे वेगळेच मत आहे. हे सर्व कट-कारस्थान आहे, कोणीतरी त्यांना ह्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे, […]
