@प्रमोद चव्हाण झुम कार कंपनीची हुंडाई क्रेटा मोटार कार पवई येथून भाड्याने बुक करून, तिचे जिपीएस. सिस्टम काढून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जगदिश सोहनराम बिष्णोई (२३) आणि महेंद्र रतीराम गोदारा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी चोरी केलेल्या ६ गाड्या राजस्थान येथून ताब्यात घेतल्या आहेत. […]
