मुंबईतील पहिलेवहिले मगर उद्यान पवई तलावात बनवण्याचे महापालिकेचे स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे. मेट्रो सहा प्रकल्पा अंतर्गत लोखंडवाला-जोगेश्वरी-पवई-विक्रोळी-कांजुरमार्ग असा मेट्रो सहाचा कॉरीडोर निश्चित केला आहे. या मेट्रो-सहा प्रकल्पाच्या कामात पवईमधील पवई तलाव परिसरातील काही भाग बाधित होणार असल्याकारणाने प्रस्तावित मगर उद्यानाचा विचार मेट्रो पूर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे. २०० हेक्टर जागेत निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या […]

