सुषमा चव्हाण गर्दिच्या काळात पवईमधील बस स्थानकांवर बसमध्ये चढणाऱ्या लोकांचे पाकिट आणि मोबाईल चोरी करून, पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका सराईत चोरास, पवईतील युवा पत्रकार रविराज शिंदे आणि त्यांचे मित्र अजय सावंत, दत्ता दाभोळकर, राजेश हजारे यांनी पकडून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरेश चव्हाण उर्फ सुर्या असे पकडण्यात आलेल्या चोराचे नाव असून; सूर्या हा पोलिसांच्या अभिलेखावरील […]
Tag Archives | Crime
पार्कसाईटमध्ये घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी
पार्कसाईट विक्रोळी येथील आंबेडकरनगर सोसायटीत शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी स्फोट झालेल्या घरातील दोघे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घर रस्त्याला लागून असल्याने घरातील काही लोक आणि पादचारीही यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी […]
हिरानंदानी समूहाला ४ कोटींची टोपी, कुंपणानेच खाल्ले शेत
नामांकित विकासक हिरानंदानी समूहाला त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने प्रसिद्धीच्या नावावर कोट्यवधीं रुपयांना गंडा घातला आहे. समूहाने आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून २ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. आरोपी हा त्याच समूहात काम करत असताना, मित्राच्या मदतीने खोटी कंपनी स्थापन करून मोठी जाहिरात देण्याच्या नावावर ४ कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. […]
पवईमध्ये अपघात सत्र, वेगवेगळ्या ३ अपघातात तिघांचा मृत्यू
पवईच्या रस्त्यांवर गुरुवारी रात्री ७ पासून शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ३ वेगवेगळे अपघात घडले. या तिन्ही अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ३ तरुणांचा गाडीखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात अपघातास जबाबदार वाहनचालकांना अटक केली आहे. गुरुवारची रात्र ही पवईतील रस्त्यांसाठी काळरात्र ठरली. रात्री ७ ते सकाळी ७ या […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये भरली वाहतूक नियमांची शाळा
आयआयटी: प्रतिनिधी भावी पिढीला वाहतुकीचे नियम समजावेत आणि जनजागृती व्हावी म्हणून, मुंबई वाहतूक पोलीस व पवई इंग्लिश हायस्कूल तर्फे शाळेच्या प्रांगणात प्रात्यक्षिक स्वरूपातील ‘वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण’ या विषयावर एका कार्याक्रमाचे आयोजन केले होते. यात शाळेतील लहान मोठ्या अशा सर्व मुलांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियम समजून घेतले. वाहन ही चैनीची वस्तू नसून, ती सध्याची […]
गांधीनगर पुलावर ट्रेलर उलटला, २ जखमी, ८ तास वाहतूक ठप्प
सिमेंट मिक्सरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गांधीनगर पुलावर गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता मिक्सर पलटी होऊन दुसऱ्या मार्गिकेवरून जाणाऱ्या इको कारसह, रिक्षा व दुचाकीला त्याने आपले शिकार बनवले. या अपघातात २ लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात मिक्सर चालक शंकू कुमार प्रसाद (३५) याला […]
३२ एक्टिवा, ६ कारसह सराईत गुन्हेगाराला पवईत अटक
पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली […]
मोबाईल चोर पवई पोलिसांच्या जाळ्यात
चालत्या बसमधून लोकांचे मोबाईल फोन, पाकीट चोरून पसार होणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव इजाज शेख (३८) असे असून, तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पवई पोलिसांनी दोन महागडे मोबाईल फोन हस्तगत करून त्याला तुरुंगाची हवा दाखवत असे गुन्हे करणारांना एक जरब बसवलेली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीमुळे पूर्व […]
व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना अटक
सा किनाका येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून, त्यास बेदम चोप देऊन, लुटून पसार झालेल्या २ चोरट्यांना पकडण्यात बीकेसी पोलिसांना यश आले आहे. अपहरण आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. साकिनाका येथील कपडे व्यापारी राजकरन यादव यांचे अपहरण करून, त्यांना निर्जन स्थळी घेऊन जावून […]
गलेरियाला महानगरपालिकेचा दणका, दुकानाबाहेर वाढवलेल्या जागेला त्वरित हटवण्याची नोटीस
हिरानंदानीतील गलेरिया शॉपिंग मॉलमधील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात व समोरील मोकळ्या जागेत बदल करून आपली दुकाने वाढवल्यामुळे मॉलची दुर्दशा झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आता ते या मॉलकडे दुर्लक्ष करून आसपासच्या परिसरात असणाऱ्या मॉल्समध्ये खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत. या बद्दल राष्ट्रवादीचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंग यांनी पालिकेकडे तक्रार केली […]
पवईकरांच्या भीतीचा फुगा फुटला, पॅराशूट नसून निघाले फुगे
विमानतळ परिसरात दिसलेले पॅराशूट हे कदाचित घातपाताच्या उद्देशाने तिथे आले होते, परंतु ते त्यात सफल होऊ शकले नाहीत आणि ते थेट पवईच्या दिशेने आले आहेत. अशी बातमी पवई परिसरात फिरत असतानाच, सोमवारी दिवसभर विविध तपास यंत्रणांनी पवई भागात राबवलेल्या तपास मोहिमेने पवईकरांची चांगलीच पाचावर धारण बसली. परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु मंगळवारी […]