Tag Archives | featured

भरधाव ट्रेलर मारूती मंदीरात घुसला, मोठे नुकसान

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर भरधाव वेगात धावणारा एक ट्रेलर आयआयटी पवई येथील मारुती मंदिरामध्ये घुसल्याची घटना (आज) रविवारी रात्री ३.३० वाजता घडली. या घटनेत मंदिराचा मंडपासह परिसरात असणारे एक जुने झाड आणि मूळ गाभाऱ्याची उजव्या बाजूची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलर चालक जमादार मोहम्मद अली (४०) याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. घटना […]

Continue Reading 0

युथ पॉवरच्या छत्री वाटप आंदोलनाला ‘बेस्ट’ यश; बस थांब्यावर बसवले छप्पर

रविराज शिंदे पवईमधील आयआयटी येथील सर्वच बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसाळ्या सोबतच उन्हातान्हात सुद्धा त्रास सहन करत बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. या बस थांब्यावर छप्पर उभारण्यात यावेत यासाठी, ‘युथ पॉवर’ संघटनेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला कानपिचक्या काढत प्रवाशांना छत्री वाटप करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बेस्ट प्रशासनाने दखल घेत अखेर पवईतील […]

Continue Reading 0

पवई, साकिनाका पोलिसांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण

डीजीटायजेशानमुळे वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखणे आणि अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पवई आणि साकिनाका पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी ३ अशा सहा अधिकाऱ्यांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबई पोलिसांच्या बांद्रा – कुर्ला (बीकेसी) येथील सायबर सेल विभागात सायबर तज्ञांकडून अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. युनिट १० मधील पवई, साकीनाका सह […]

Continue Reading 0

हिरानंदानीत बांधकाम थांबलेली जागा बनली आजार पसरवणाऱ्या मच्छरांचा उत्पत्तीचा अड्डा

हिरानंदानी गृप दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर पालिका एस विभाग अधिकाऱ्यांनी आज भेट देवून केली परिस्थितीची पहाणी. हिरानंदानी विकासकाकडून पवई, हिरानंदानी येथील ओडिसी आणि तिवोली इमारतींजवळ सुरु असणाऱ्या एका नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून थांबवण्यात आले असून, येथे जमा झालेल्या घाण पाण्यामुळे आजार […]

Continue Reading 0

युथ पॉवरची आरोग्य सेवा योजना; दरमहा रूग्णालयात करणार मोफत फळे वाटप

  पवई | रविराज शिंदे शारीरिक व मानसिक दृष्टिने रोगमुक्त आणि तंदुरुस्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य. प्रत्येक नागरिकांने रोगमुक्त राहवे म्हणून पवईतील नवतरूणांच्या युथ पॉवर या संघटनेने आरोग्य सेवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत संघटनेच्यावतीने गेल्या दोन महिन्यापासून उपनगरातील जवळपास सर्वच सरकारी रूग्णालयात रूग्णांना आरोग्यास हितकारक असणाऱ्या फळांचे वाटप केले जात आहे. भांडूप येथील […]

Continue Reading 0
police birthday tweet

साकिनाका पोलीस ठाण्यात साजरा झाला तक्रारदाराचा वाढदिवस

When personal details in the FIR revealed it’s complainant Anish’s birthday, a Cake followed the FIR Copy at Sakinaka Pstn ? pic.twitter.com/tEBnNYdJ3y — Mumbai Police (@MumbaiPolice) October 14, 2017 कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व जनतेमध्ये पोलिसांच्या बाबतीत विश्वास संपादन करण्यासाठी मुंबई पोलीस सतत कार्य करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. साकिनाका पोलिसांनी सुद्धा असेच एक उदाहरण […]

Continue Reading 0

शिव-भगतानी रोडला खड्डे; खाजगी रोड असल्याचे सांगत पालिकेचे दुर्लक्ष

आवर्तन पवई | पवई – चांदिवली चांदिवली आणि हिरानंदानी भागाला जोडणारा शोर्टकट रोड शिवभगतानी कॉम्प्लेक्समधून जात आहे. या रोडवरून होणाऱ्या मोठ्या वाहतुकीमुळे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. कॉम्प्लेक्सची निर्मिती करणाऱ्या विकासकाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, रस्ता खाजगी असूूून विकासकाने पालिकेच्या स्वाधिन केला नाही असे सांगून पालिका याच्यातून हात […]

Continue Reading 0

भाजप प्रवक्ताने विद्यार्थ्याबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याच्या विरोधात विद्यार्थ्यांची हॅशटॅग मोहीम

आवर्तन पवई | मुंबई मुंबई विद्यापीठाच्या पेपर पुनर्तपासणी  निकालात होणाऱ्या दिरंगाई आणि विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल संजय पाटील या संतप्त विद्यार्थ्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना टॅग करून केलेल्या ट्वीटला भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी प्रतीउत्तरादाखल केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमावर हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत विद्यार्थी #लायकीनाही #अवधूतवाघ #विनोदतावडे असे […]

Continue Reading 0

नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रयत्नातून तिरंदाज पालिका शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरु

तिरंदाज व्हिलेज पालिका शाळेत इमारतीच्या स्लबचे पोपडे निघून पावसाळ्यात पाणी गळती होत होती. तसेच परिसरात शेवाळ तयार झाल्याने मुले घसरून पडण्याची शक्यता वाढली होती. याची दखल घेत स्थानिक नगरसेविका यांच्या प्रयत्नातून शाळा इमारत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये आधीच मुलांची संख्या कमी झाली होती त्यातच […]

Continue Reading 0

स्वच्छ पवई अभियानाचे तिन तेरा, गोखलेनगरजवळ फुटपाथवर फेकला कचरा

कचरा उचलण्याचे काम करणारा जुना कंत्राटदार राजू आम्हाला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करत आहे – श्रीकांत पाटील  (भाजप जेष्ठ कार्यकर्ते – वार्ड १२२) पवईमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ पवई अभियान या उपक्रमाला खोडा घालत पवईमध्ये घाण पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गोखलेनगर येथील एका पडक्या […]

Continue Reading 0
छायाचित्र: दैनिक भास्कर

बिहटा हत्या प्रकरणातील “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना पवईमध्ये अटक

पटना बिहटा येथील चित्रपटगृह मालक निर्भय सिंघ यांची गोळ्या घालून हत्या करून फरार झालेल्या “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना आज (शनिवारी) पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तुंगा येथून अटक करून पटना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बिहाट, पटना येथील नामांकित व्यक्तिमत्व आणि येथील उदय चित्रमंदिर सिनेमा हॉलचे मालक निर्भय सिंघ यांची चित्रपटगृहाच्या समोर मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात […]

Continue Reading 0
nsg cmnd house theft

एनएसजी कमांडोच्या घरातून रिव्हॉल्व्हर, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना अटक

मि लिंदनगर म्हाडा येथील इमारतीत राहणारे एनएसजी कमांडो संदिप पानतावणे (३२) यांच्या घरात घुसून, चोरी करून त्यांची वैयक्तिक रिव्हॉल्व्हर, २० जिवंत काडतूस, ३ तोळे सोने आणि चार हजाराची रोकड लंपास करणाऱ्या दोन चोरांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. शमिम सलिम शेख (२३) आणि सादिक अक्कानी शेख (२३) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून, […]

Continue Reading 0

वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम

आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]

Continue Reading 0

चांदिवली इमारत दुर्घटना: मृतांची संख्या चार, बचावकार्याला गती

शनिवारी चांदिवली, संघर्षनगर येथे इमारत पडण्याचे काम सुरु असताना झालेल्या दुर्घटनेत त्याच दिवशी एकाचा मृत्यू झाला होता. रविवारी रात्री ढिगाऱ्याखालून काढलेल्या अजून एक कामगाराचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सोमवारी बचाव पथकाच्या हाती अजून दोन कामगार लागले असून, त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता चार झाली आहे. सोमवारी संध्याकाळी बचावकार्य सुरु असताना […]

Continue Reading 0
IMG_20170826_184232.jpg

चांदिवलीत इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, दोन जखमी, बचावकार्य सुरु

चांदिवली, संघर्षनगर बस स्टॉपजवळील कृष्णा बिसनेस पार्क या इमारतीला पाडण्याचे काम सुरु असताना इमारतीचा वरील माळ्यांचा काही भाग कोसळल्याची घटना आज (शनिवारी) संध्याकाळी घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली अजून ४ ते ५ लोक अडकल्याची शक्यता असून, अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे. […]

Continue Reading 0
IMG_1149

पवई हिरानंदानीमध्ये सोनू निगम आणि गोविंदा यांनी केले आनंद मिलिंद म्युजिक अकॅडमीचे उदघाटन

पवई, हिरानंदानी येथे असणाऱ्या हिरानंदानी लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये काल शनिवारी बॉलीवूडलमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी आनंद-मिलिंद यांच्या ‘”आनंद मिलिंद अकॅडमी ऑफ म्युजिक”चे उदघाटन गायक सोनू निगम आणि अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बांधकाम व्यवसायात उच्च शिखरावर विराजमान असणाऱ्या हिरानंदानी गृपतर्फे शिक्षण संस्था सुध्दा चालवल्या जात आहेत. याचाच एक भाग […]

Continue Reading 2

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!