@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण भाजपाने मुंबई महापालिका जिंकण्याचा विडा उचलल्याने शिवसेना सर्वतोपरी दक्ष झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अनेक शाखांना गुरुवारी भेट देऊन शिवसैनिकांना झपाट्याने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई भेटी दरम्यान त्यांनी पवईतील शाखा क्रमांक १२२ मध्ये येथील शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी […]
Tag Archives | featured
पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न
पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव यावर्षी ७ व ८ नोव्हेंबरला डॉकयार्ड मैदान, कांजुरमार्ग आणि शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्नल सुरी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शरली उदयकुमार आणि पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना मॅडम यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन आणि […]
पवईत पालिका एस विभागातर्फे रस्ते दुरुस्तीच्या कामांची सुरुवात
पावसाळ्यानंतर खराब झालेल्या, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून लोकांना चांगल्या रस्त्यांची सोय करून देण्याच्या कामांची सुरुवात पालिका ‘एस’ विभागाकडून सुरु झाली असून, याचा शुभारंभ जलवायू आणि म्हाडा कॉम्प्लेक्सच्यामधून असणाऱ्या रोडच्या कामाच्या सुरुवातीने झाला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. मुंबई आणि खराब रस्ते यांचे एक अतूट नाते आहे. पावसाळा आला की, मुंबईत ठिकठिकाणी पालिका […]
पवई तलाव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गुंडाळला; पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर पालिकेचा निर्णय
पवई तलावात विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र हा प्रकल्प बसवण्याचा खर्च करण्याऐवजी, तलावात सांडपाणी सोडण्यात येवू नये अशी मागणी पॉज या पर्यावरणवादी संघटनेने लावून धरली होती. याबाबत आवर्तन पवईने पाठपुरावा केला होता. महानगर पालिकेने अखेर आपला हा निर्णय पाठीमागे घेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुसरे उपाय योजणार […]
हिरानंदानी – विक्रोळी लिंक रोडचा ‘नारळ फुटला’
जवळपास १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी –विक्रोळी लिंक रोडला आता नवसंजीवनी मिळणार आहे. याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडसाठी विधान परिषद सदस्य आमदार आर. एन. सिंह यांच्या प्रयत्नातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १० लाख रुपयांचा फंड मंजूर करण्यात आला […]
हिरानंदानीतील बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश
हिरानंदानी सुप्रीम बिजनेस पार्कच्या पाठीमागील भागात गेली ३ वर्षे वास्तव्य करून असणारा आणि सुप्रीम बिजनेस पार्कमध्ये कामासाठी येणाऱ्या अनेक लोकांना अधूनमधून दर्शन देणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वन अधिकाऱ्यांना यश आले आहे. पवईत ऑक्टोबर २०१३ ला पकडल्या गेलेल्या बिबट्यानंतर तीन वर्षात मुंबईत पकडला गेलेला हा पहिला बिबट्या आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी वन विभागाने […]
नोट बंदी’ समर्थनात पवईकरांची रॅली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या ‘नोट बंदी’च्या घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात पवईतील नागरिकांनी आज (शनिवारी) संध्याकाळी एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात समाजातील विविध स्तरातील लोक सहभागी झाले होते. “मोदीजी काले धन के सर्जिकल स्ट्राईक मे हम आपके साथ हैं”, “काळे धन के खिलाफ आप का संघर्ष वंदनीय हैं”, […]
हिरानंदानी – विक्रोळी लिंक रोडसाठी दहा लाख मंजूर
हिरानंदानी–विक्रोळी रोडच्या निर्मितीसाठी आमदार आर. एन. सिंह (विपस) यांना महाराष्ट्र शासन नियोजन विभाग निधीतून १० लाखाचा फंड मंजूर गेली अनेक वर्ष श्रेयवाद, कोर्ट-कचेरी अशा अनेक फेऱ्यात अडकल्याने दुर्दशा झालेल्या हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडला अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. आमदार आर. एन. सिंह (विपस) यांनी प्रस्तावित केल्यानुसार जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या […]
आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्या
आयआयटी कॅम्पस परिसरातून बरेच दिवस गायब झालेल्या बिबट्याचे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कॅम्पस परिसरात दर्शन घडू लागले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी असे अनेक लोकांना या बिबट्याने दर्शन दिले असून, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा हा बिबट्या फिरताना कैद झाला आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, बिबट्या नक्की कुठे लपून बसत आहे याची […]
पादचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थिनीने रंगवले पादचारी पूल
पादचारी पूल असून ही जीवावर उदार होत वाहतुकीतून रस्ता काढत जाणाऱ्या मुंबईकरांना पादचारी पुलाकडे आकर्षित करण्यासाठी, आयआयटी पवईत शिकणाऱ्या सलोनी मेहता या विद्यार्थिनीने सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १५ तास खर्ची घालून आयआयटी मेन गेट समोरील पादचारी पूल व परिसराची साफसफाई करून पायऱ्या व भिंती चित्रे काढून आणि रंगवून लोकांना या पादचारी पुलाचा वापर करण्यासाठी आकर्षित केले […]
महिलेवर सामुहिक बलात्कार
आंबोली भागात भाड्याने घर पाहण्यासाठी गेलेल्या पवईतील २८ वर्षीय महिलेवर ८ तरुणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत पोलिसांनी आठ ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नस्तेन जाफर अली शेख उर्फ बाबू बंगाली (१९), नागेश धनगर (१९), इमरान शेख (२३), मोहमद गुलाम हुसेन खान (२३), राकेश […]
चांदिवलीत आजपासून ‘आई महोत्सव’
गुरुवार ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर स्व. मिनाताई ठाकरे संस्कार-धाम म्हाडा कॉलनी चांदिवली येथे साजरा होणार महोत्सव शिवसेना शाखा १५७/१५८ पुरस्कृत आणि स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांच्या वतीने स्व. मिनाताई ठाकरे संस्कार-धाम, म्हाडा कॉलनी चांदिवली येथे आईची आठवण आणि संस्कार सांगणारा ‘आई महोत्सव’ आजपासून ६ नोव्हेंबर पर्यंत साजरा होत आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते […]
पवईत शिवसेनेचा विकास कामांचा सपाटा
स्थानिक नगरसेवकांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं असतानाच उद्यानांची डागडुजी, घर घर शौचालय अंतर्गत मलनिसारण वाहिनी टाकण्याचे काम, गर्दुले – नशेखोरांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्यासाठी सुरक्षा उपाययोजना, शाळेच्या बसची वाट पाहत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावत शिवसेनेच्यावतीने पवईत कामाचा सपाटा लावला आहे. मुंबईच्या शिरपेचाचा तुरा असणाऱ्या पवईला गेल्या काही वर्षात अनेक समस्यांनी ग्रासलेले […]
सोशल नेटवर्क साईटवर मैत्री करून महिलेला दोन लाखाचा गंडा
पवईतील एका ३४ वर्षीय महिलेशी सोशल नेटवर्किग साईटवर मैत्री करून, भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने १.७३ लाखाचा गंडा घातल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत पवई पोलिसांनी भादवि आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. गिता पारेख (बदललेले नाव) या पवईतील अशोकनगर भागात आपल्या दोन मुलींसोबत राहतात. त्यांचे पती मर्चंट नेव्हीमध्ये कामाला […]
पवईत ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ उत्साहात साजरा
आंतरराष्ट्रीय संस्था तफिसातर्फे जगभर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑल’च्या वतीने रविवारी हेरिटेज गार्डन हिरानंदानी येथे ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ आणि ‘टेक युवर स्ट्रीट बॅक’चे आयोजन केले गेले होते. यावेळी जगदगुरु सुर्याचार्य कृष्णानंद देवनंदगिरी (मथुरापीठ), अवधूतानंद सरस्वती शंकराचार्य, […]
पवईकरांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्ण संधी
१७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१६ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० तिरंदाज शाळेत मोहीम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची, दुरुस्ती करण्याची व ठिकाणाच्या बदलाच्या नोंदणीची सुवर्णसंधी पवईमधील जनतेस चालून आली आहे. आय आय टी येथील तिरंदाज शाळेत यासाठी मतदार नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. स्थानिक नगरसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्यावतीने तिरंदाज मनपा शाळेत १७ ऑक्टोबर […]
महानगरपालिका निवडणुकीत पवईला आरक्षण
रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रभागांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाली असून यावेळी महापालिकेच्या २२७ पैकी १५ वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. पवईतील प्रभाग क्रमांक ११५ चे १२२ तर ११६ चे १२१ प्रभागात विभाजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १२२ हा ओबीसी महिला आरक्षित झाला आहे, […]
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिरानंदानीतील रस्ते होणार ‘वन वे’
हिरानंदानी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी हिरानंदानी विकासकाने पाऊले उचलत, आकार अभिनव कन्सल्टंट माध्यमातून वाहतूक समस्येचा अभ्यास केला आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे वाहतूक विभागाला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालानुसार हिरानंदानीतील काही रस्ते एकमार्गी (वन वे) करण्याचे सुचवले आहे. गेल्या काही महिन्यात हिरानंदानीत वाहतुकीच्या समस्येने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. दररोज वाढत जाणाऱ्या या […]
पवई तलाव वाचवण्यासाठी युथ पॉवर सरसावले
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मानवी साखळीतून केली जनजागृती रविराज शिंदे ‘भ्रष्टाचाराचा बोलबाला, पवई तलावाचा नाला केला’ ‘दुर्लक्ष कोणाचे? लोकप्रतिनिधींचे, पालिका प्रशासनाचे’ या घोषणांनी रविवारच्या सकाळी पवई तलाव परिसर निनादला. पवई तलावात पावसाचे पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांमधून येथील वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. तलावाची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी व नैसर्गिक अस्तित्व राखण्यासाठी ‘युथ पॉवर’ संघटनेने […]
अन् उभी इंडिगो पेटली
चांदिवली भागात चालत्या रिक्षाला आग लागून रिक्षा जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, आयआयटी येथील तिरंदाज शाळेसमोर कारच्या एसीत शॉर्ट झाल्याने पार्किंगमध्ये उभी टाटा इंडिगो पेटल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. मात्र इंडिगो गाडी पूर्ण जळून खाक झाली असून, तिच्या जवळ पार्क असणाऱ्या कॉलीस आणि मारुती […]