Tag Archives | Marathi

online-scam

एनआरआय असल्याचे सांगत महिलेला ३ लाखाचा ऑनलाईन गंडा

साकीनाका येथील ३२ वर्षीय महिलेला तिच्यासोबत विवाहास इच्छुक असल्याचे सांगत एका भामट्याने ३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. नीरज कपूर असे या भामट्याचे नाव असून, महिलेने वैवाहिक वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर दोघांची ओळख झाली होती. या भामट्याने आपण एनआरआय असल्याचा दावा करत तिला आपल्या जाळ्यात अडकवले. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साकीनाका येथे राहणाऱ्या आणि खाजगी कंपनीत नोकरी […]

Continue Reading 0
pl led

पवई तलावाचा विकास सीईआरच्या माध्यमातून

पवई तलावाचा कायापालट ‘सांघिक पर्यावरणीय जबाबदारी’च्या (कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलीटी- सीईआर) माध्यमातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्तांच्या उपस्थित झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने पवई तलावाचा विकास, मुलुंड ते पवई भागात मियावाकी पद्धतीने वनीकरण,झोपडपट्टी सुधारणा, करोनाविषयी जनजागृतीसाठी चित्रफित, विद्यार्थ्यांना संगणक आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षक आदी विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे. हे प्रकल्प […]

Continue Reading 0
lande1

मराठीच हवी ! आमदार लांडेनी इंग्रजी कागदपत्रे फाडून अधिकाऱ्यांकडे भिरकावली

चेंबूर पालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी इंग्रजी कागदपत्रे सादर केल्याने चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे पाटील संतापले. त्यांनी ती कागदपत्रे फाडून अधिकाऱ्यांकडे भिरकावली. “शासन निर्णय असताना देखील अधिकारी इंग्रजीतच कामकाज करतात. मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पुन्हा जर असे घडले तर अधिकाऱ्यांना कडक उत्तर देऊ.” – आमदार दिलीप मामा लांडे इंग्रजीत सगळा कारभार करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना […]

Continue Reading 0
mobile theft

पवईत बस स्थानकांवर मोबाईल चोरांची टोळी सक्रीय; कस्टम अधिकाऱ्याचा मोबाईल चोरला

पवईत बसमध्ये चढताना असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने कस्टम अधिकार्‍याचा मोबाईल लांबवल्याची घटना शुक्रवारी पवईमध्ये घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करुन पवई पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. ४२ वर्षीय तक्रारदार हे कस्टम विभागात निरीक्षक पदावर कार्यरत असून, भांडूप पूर्व परिसरात राहतात. ते मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी आपल्या वापरासाठी या महिन्याच्या सुरुवातीला नुकताच एक […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!