Tag Archives | mumbai

temperature powai

शुक्रवारी पवईमध्ये हंगामाचे सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले

मुंबईत आता गारठा वाढू लागला असून, शुक्रवारी मुंबईत आतापर्यंतचे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. सांताक्रूझ हवामान वेधशाळेत या दिवशी १९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जे सामान्यते पेक्षा कमी होते. तर दक्षिण मुंबईच्या कुलाबा हवामान स्टेशनमध्ये २२.५ अंश डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पवईमध्ये शुक्रवारी मुंबईतील सर्वात कमी म्हणजेच १८.३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. […]

Continue Reading 0
aarey road entry restricted

पवईत पुलाचा भाग कोसळला; आरेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

पूल धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. पवईतील आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर असणारा मिठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव […]

Continue Reading 0
swachhata sudhakar kamble powai

पवई परिसरात ‘दिवाळी कचरा स्वच्छता अभियान’चे आयोजन

दिवाळीनंतर मुंबईच्या रस्त्यांवर फोडलेल्या फटाक्यांचा खच हा प्रत्येक वर्षी पडलेला असतो. याच समस्येला लक्षात घेत समाजसेवक आणि पवई पोलीस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पवई विभागात दिवाळी सणामध्ये फटाक्यांमुळे निर्माण झालेला कचरा साफ करत स्वच्छ प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

१८ वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक

पवई तलावावर एका अठरा वर्षीय तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरून मुंबई गुन्हे शाखा युनिट १० अधिका-यांनी मंगळवारी तीन जणांना अटक केली आहे. विनोद नंदलाल ठाकूर, शशांक रामचंद्र जाधव आणि निकेश गंगाराम जाधव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मृतक तनवीर नदाफ पवई तलाव भागात फिरत असताना आरोपी आणि नदाफ दोघांच्यात शाब्दिक वाद […]

Continue Reading 0
air quality graph Mumbai

हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर

पवईतील निर्देशांक मध्यम स्तरावर नोंदविण्यात आला. टाळेबंदीत (लॉकडाऊन) सुधारलेली मुंबईच्या हवेची गुणवत्ता पुन्हा घसरू लागली असून, मंगळवारी ती घसरून वाईट स्तरावर पोहोचल्याचे नोंदीतून समोर आले आहे. अनलॉकनंतर रस्त्यांवर वाढलेली वाहनांची संख्या ऋतूंमधील बदल आणि हळूहळू सुरु होत असलेली मुंबई यामुळे गुणवत्ता निर्देशांक घसरू लागला आहे. पवईचा निर्देशांक मध्यम स्तरावर नोंदविण्यात आला. सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी […]

Continue Reading 0
activa theft

सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत

पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]

Continue Reading 0
Shop Worker Arrested For Brutalising Powai Dog

हिरानंदानीत कुत्रीसोबत अत्याचार करणाऱ्या दुकान कामगाराला अटक

पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या गलेरिया मॉलमध्ये भटकी कुत्री नुरी हिच्यासोबत अत्याचार करून, तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंबूनाथ ओटोकांथो प्रधान (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो याच मॉलमधील एका मिठाईच्या दुकानात काम करतो. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्या भागातील डझनभर सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत एकाचा खून; कुजलेल्या अवस्थेत सापडले शव

पवई पोलिसांच्या हद्दीत एका ३० ते ३५ वर्षीय पुरुषाचे शव शुक्रवारी बेवारस अवस्थेत मिळून आले असून, त्या तरुणाचा खून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलिसांना आयआयटी मार्केट जवळील फुलेनगर परिसरातील डोंगराळ भागात एका तरुणाचे शव […]

Continue Reading 0
fire tempo rambaug flyover

इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना सोमवार, ५ ऑक्टोबर रात्री पवई परिसरात घडली. प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूला लावत गाडीतून बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीची नोंद झाली नसून, टेम्पो जळून खाक झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो क्रमांक एमच १५ एफवी ११५४ असल्फा येथून इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून नाशिकला […]

Continue Reading 0
BMC spitting issue

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड ठोठावणाऱ्या पालिकेच्या कार्यालयातच नागरिकांच्या अंगावर पिचकारी

पालिकेतर्फे स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई अंतर्गत मुंबईत सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणाऱ्या आणि थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई करत दंड ठोठावले जातात. मात्र पालिकेच्या दरवाजातच असे कृत्य घडत असेल तर त्याचे काय? पालिका एस विभागात आपल्या कामानिमित्त येणाऱ्या लोकांसोबत असे प्रकार वारंवार घडत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी या कार्यालयातील खिडक्यांना जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे. या […]

Continue Reading 0
birthday with street kids

रस्त्यावरील बेघर मुलांसोबत वाढदिवस

आपला वाढदिवस आप्तस्वकीयांसोबत सेलिब्रेट करणारे अनेक नजरेस पडतात. मात्र गरीब गरजू, बेघर आणि रस्त्यावरील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरे करणारे क्वचितच. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली एकमेकांपासून लोक लांब पळत असतानाचा पवईतील एका तरुणीने चक्क रस्त्यावरील बेघर मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. पवईतील तुंगागाव येथे राहणारी तरुणी हर्षु पवार हिचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. सर्वसामान्याप्रमाणे […]

Continue Reading 0
fire water tanker

पवईत पाण्याच्या टँकरला आग

पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) धावत्या पाण्याच्या टँकरला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांच्या मदतीने दुसऱ्या एका टँकरमधील पाणी वापरून आग विझवण्यात आली. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका वॉटर सप्लाय कंपनीचा टँकर हा पाणी घेवून जेविएलआर वरून अंधेरीच्या दिशेने जात होता. मरीन इन्स्टिट्यूट […]

Continue Reading 0
maratha morcha

मराठा आरक्षणासाठी पवईत आंदोलन

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पवईसह मुंबईत विविध ठिकाणी रविवारी आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाजाने रस्त्यावर उतरत आंदोलने केली. पवईतील आयआयटी मेनगेट समोर मराठा समाजांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, जोपर्यंत स्थगिती उठविली जात […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईसह मुंबई आणि आसपासच्या भागात १० घरफोड्या करणाऱ्या दुकलीला अटक

अटक दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि नाशिक येथे यापूर्वी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊनच्या काळात पवईसह, मुंबई, ठाणे, डोंबिवली, नाशिक आणि इतर ठिकाणी मिळून १० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखा युनिट १० ने अटक केली आहे. ९ ऑगस्ट रोजी पवई येथील घरात घुसून ३ लाख […]

Continue Reading 0
handi powai

पवईत कोरोनामुक्त दहीहंडी

कोरोनाने देशभर थैमान घातलेला असल्याने याचे सावट दहीकाला उत्सवावर जाणवले. मुंबईतील अनेक मानाच्या आणि मोठ्या हंड्या रद्द करण्यात आल्या. कोरोनामुळे याही उत्सवावर विरजण पडले असताना अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. पवईतही कोरोनाची स्थिती पाहता कोरोनामुक्त दहीहंडी साजरी करण्यात आली. शिवसेना शाखाप्रमुख मनिष नायर आणि माजी शाखाप्रमुख धरमनाथ पंत यांच्या संकल्पनेतून ही दहीहंडी साजरी […]

Continue Reading 0
vba powai food distribution

वंबआ मुंबईच्या वतीने पवईत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लॉकडा्ऊन शिथिल करत अनलॉकचा दिशेने प्रवास सुरु झाला असला तरीही या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या हाताला अजूनही काम नाही आहे. असे लोक उपाशी राहू नयेत यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबईच्यावतीने सोमवारी पवई येथे मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मुंबईप्रदेश सदस्य भारत हराळे यांच्या नेतृत्वाखाली गरजू गरीब […]

Continue Reading 0
MLA and corporators Inspected security wall in Powai

पवईतील सुरक्षा भिंतीची आमदार, नगरसेवक यांच्याकडून पाहणी

मुंबईतील सततच्या पावसामुळे पवईतील मोरारजीनगर, रमाबाई आंबेडकर ग्रुप नं २, शिवनेरी हिल, देवीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरीओमनगर लोकवस्तीला जाणाऱ्या मार्गावर असणारी सुरक्षा भिंतीचा भाग गुरुवार, १६ जुलैला पडल्याची घटना घडली होती. यानंतर स्थानिक आमदार आणि नामनिर्देशित नगरसेवक यांनी परिस्थितीची पाहणी करत यंत्रणांना त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबईत आठवड्याच्या मध्यंतरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. […]

Continue Reading 0
bike-theft

मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक

साकीनाका येथून चोरीला गेलेली काळ्या रंगाची पल्सर २२० मोटारसायकल सह ४ मोटारसायकल पोलिसांनी केल्या हस्तगत सुरक्षित पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकल वर पाळत ठेवून संधी साधत बनावट चावीने तिची चोरी करून अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखा कक्ष ११ने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यातील एक साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील […]

Continue Reading 0
फोटो: संतोष सागवेकर

पाणीपुरवठा करणार्‍या तलावात ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा

पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मात्र या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरात येत नाही. २०२० वर्षात सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने (IMD)  वर्तवला होता. या अंदाजानुसारच पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आवश्यक तितका पाऊस होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः […]

Continue Reading 1

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!