मुंबईत पाठीमागील काही दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसत मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिलेले आहेत. अशावेळी आपल्या विभागातील पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित रित्या झालेली आहेत का? याचा शुक्रवार, १७ जून रोजी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. तसेच हिरानंदानी येथील उद्यानात बनवण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन त्यांच्या […]
Tag Archives | NEWS
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंग एन्व्हायर्नमेंटतर्फे पवई तलावाच्या किनाऱ्याची स्वच्छता
यंग एन्व्हायर्नमेंट ट्रस्टतर्फे ४ आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवई तलावाच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुण पर्यावरणवादयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. हेव्हन्स अॅबोड फाऊंडेशन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक सदस्यांसह मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी […]
लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून पवईकराला केले ब्लॅकमेल
एका खाजगी कंपनीत नोकरीला असणाऱ्या २८ वर्षीय पवईकराला लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार याने घेतलेल्या ५,००० रुपयांच्या कर्जाच्या दुप्पट रक्कम ९,४६४ रुपये परत करूनही अधिक पैसे देण्यास सांगून त्याचा मॉर्फ केलेला फोटो त्याच्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टवरील शेकडो लोकांना प्रसारित करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल […]
नॅशनल मास्टर स्पर्धेत एअर रायफल शूटिंग खेळात पवईकराला गोल्ड
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या पवईतील राजेंद्र जाधव यांनी नॅशनल मास्टर स्पर्धेत एअर रायफल शूटिंग खेळात गोल्ड मिळवत पवईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यानंतर टोकीओ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील त्यांची निवड झाली आहे. केरळ (ञिवेद्रम) येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या नॅशनल मास्टर स्पर्धेमध्ये १०मिटर एअर रायफल शूटिंग (पीप साईट) या खेळात […]
स्काईप कॉलवर चाचणी; सिव्हिल इंजिनिअरला परदेशी नोकरीच्या बहाण्याने नऊ लाख रुपयांचा गंडा
एका खाजगी कंपनीत काम करणारा ५२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर नुकताच परदेशी नोकरीच्या फसवणुकीला बळी पडला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला यूकेमध्ये नोकरीची ऑफर दिली आणि व्हिसाची व्यवस्था आणि इतर विविध शुल्कासाठी ९ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. फसवणूक करण्यापूर्वी एक बनावट व्हिडिओ मुलाखतही घेतली. साकीनाका पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, १३ […]
पवईसह मुंबईत अंमलीपदार्थ पुरवठा करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक
अटक आरोपी हा पवईसह अंधेरी- गोरेगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच रस्त्यावरील पेडलर्सना मेफेड्रोनचा पुरवठा करत होता. झडतीत त्याच्याकडून ६० लाख किंमतीचे मेफेड्रोन मिळून आले. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे, जो मुंबईतील टॉप ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक आहे. आरोपीची दिवसाच्या कोणत्याही वेळी कितीही प्रमाणात मेफेड्रोनची डिलिव्हरी करण्यास सक्षम […]
बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाला सायबर चोरट्यांचा २० हजारांचा गंडा
एका बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाची २०,००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईमध्ये घडली आहे. सायबर चोरट्यांनी पाठवलेल्या एका संदेशावर विश्वास ठेवून त्यातील लिंकवर क्लिक केल्याने संगीत दिग्दर्शकाला २० हजार रुपये गमवावे लागले आहेत. संदेशामध्ये पॅन कार्ड अपडेट न केल्यामुळे त्याचे बँक खाते निलंबित केले जाणार आहे, खाते निष्क्रिय करणे टाळण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्याचे […]
‘मामा’ आमच्या रोडच्या कामाचा मुहुर्त कधी? – पंचश्रुष्टी नागरिक
विकासकाने पालिकेला सुपूर्द न केल्याने वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या पंचश्रुष्टी रोडला नवसंजीवनी मिळणार असल्याची आशा देत स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी नारळ फोडून हे काम लवकरात लवकर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र ३ महिन्यातच हा मार्ग बनवून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता त्याला जवळपास वर्ष उलटून गेले तरी या रस्त्याचे काम सुरु झाले नसल्याने […]
पवईत १६व्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
सोळाव्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पवई येथे घडली आहे. शिवम पांडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, पवई पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. शिवम हा पवईतील रहेजा विहार भागात असणाऱ्या इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होता. “दहावीत शिकणाऱ्या शिवमचा एक पेपर बाकी असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तो अभ्यास करत बसला […]
परिमंडळ १० पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते सोमवारी (२१ मार्च) राजभवन, मुंबई येथे आयोजित समारंभात ९७ पोलीस अधिकारी (police officers) आणि पोलीस कर्मचाऱ्यांना (police persons) शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदके (President’s Police Medals for Gallantry), गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके (President’s Police Medals for Meritorious Service) आणि पोलीस पदके (Police Medals […]
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल
आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ३५ वर्षीय व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वळवी याची पत्नी सततच्या भांडणाला कंटाळून जानेवारीपासून तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे. शनिवारी वळवी आरे रोड येथील तिच्या सासरच्या घरी गेला होता. आपल्या पत्नीला त्याच्याकडे परत पाठवण्याची तो मागणी करत असताना यावरून […]
पवई – चांदिवली रंगली होळीच्या रंगात
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]
इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पवईच्या मुलांची छाप, टॉप १४ मध्ये निवड
पवईच्या मुलांनी कला क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवत सोनी टेलिव्हिजनवर सुरु असणाऱ्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रियालिटी शोमध्ये टॉप १४ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आहे. पवईच्या मुलांचा सहभाग असणाऱ्या ‘डिमॉलिशन क्रू’ने हे स्थान मिळवत पवईच्या नावाचा झेंडा अजून उंचावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित एक प्रसंग आपल्या कलेतून सादर करत मुलांनी हे स्थान […]
पवई तलावाचे पर्यावरणीय मूल्यांकन
मुंबई महानगरपालिकेमार्फत पवई तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करत असताना पर्यावरणीय मापदंड राखले जावेत, यादृष्टिने पालिकेतर्फे पवई तलाव पर्यावरणीय मूल्यमापन संस्था नियुक्त केली जाणार आहे. तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण, तलावाच्या भागातून नियोजित सायकल ट्रॅकच्या कामांसह विविध कारणांमुळे तलावाची होणारी हानी रोखण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. […]
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उदघाटन
पवई विभागातील उद्योजक अशोक पोखरकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शुभहस्ते शनिवारी करण्यात आले. पवईतील वसाहत येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे, नगरसेवक किरण लांडगे, शाखाप्रमुख मनीष नायर, शिवसैनिक शिवा सूर्यवंशी उपस्थित होते. कै. बबनराव पोखरकर यांच्या स्मरणार्थ पोखरकर कुटुंबियांतर्फे ही रुग्णवाहिका सेवा पवईकरांसाठी […]
मित्राच्या जागी लेखी परीक्षेला बसलेल्या व्यक्तीला पवईमध्ये अटक
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भरती मोहिमेदरम्यान आपल्या मित्राच्या जागी लेखी परीक्षेला बसल्याच्या आरोपावरून पवई पोलिसांनी मंगळवारी एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. डमी उमेदवार म्हणून काम करणाऱ्या गणेश सतवनला चेतन बेलदार याने लेखी परीक्षेत प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठ्या रकमेचे आश्वासन दिले होते, असे पोलिसांनी सांगितले. म्हाडाने ५६५ पदे भरण्यासाठी भरती मोहीम सुरू केली […]
पवईकर १४ वर्षीय विद्यार्थ्याचे व्लॉग सुपरहिट, यु्टूयबने दिलं सिल्व्हर बटन
पवई इंग्लिश हायस्कूलचा दुसरा तारा चमकतोय युट्यूबच्या दुनियेत स्मार्टफोनच्या उदयानंतर अनेक हौशींनी आपलं युट्यूब चॅनेल (YouTube Channel) काढून आपल्यातली कला जगासमोर नेण्याचा प्रयत्न केला. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण युट्यूबवर आपल्या कलेचे सादरीकरण करत असतात. मात्र व्हिव्हर्सना बांधून ठेवण्यात सगळेच यशस्वी होतात असे नाही. मात्र पवईतील एका १४ वर्षीय व्लॉगरने (vlogger) हे यश संपादन करण्याचा पहिला […]
आई-वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून बहिण-भावाची सायकलने शाळेकडे धाव
आई वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून पवईतील एका भाऊ – बहिणीने बुधवारी सायकलने शाळेकडे धाव घेतली. मात्र मुले न सांगता अचानक गायब झाल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. माहिती मिळताच पवई पोलिसांनी काही मिनिटातच तांत्रिक माहितीच्या साहाय्याने त्यांना शोधून काढून पालकांच्या स्वाधीन केले. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज सुरु […]
आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापेक्षा जास्त काळ रिकाम्या पड्लेल्या शाळा आज विध्यार्थ्यांच्या रूपात पुन्हा भरल्या. पवईमध्ये सुद्धा आज अनेक शाळांनी सुरुवात केली. मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवत शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुलांचे शाळेत स्वागत केले. १ फेब्रुवारीला शाळा सुरु होण्यापूर्वी ३० आणि ३१ जानेवारीदरम्यान शाळांमधील स्वच्छता आणि […]